म. गांधींबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; नागपुरात तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:19 IST2019-09-13T15:03:58+5:302019-09-13T15:19:51+5:30
म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिकाटिप्पणी करणाऱ्याा मयूर जोशी नामक व्यक्तीविरुद्ध नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस ग्रूपने शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

म. गांधींबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; नागपुरात तक्रार दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिकाटिप्पणी करणाऱ्याा मयूर जोशी नामक व्यक्तीविरुद्ध नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस ग्रूपने शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. जोशीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सायबर शाखेच्या मदतीने या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे.
मयूर जोशी नामक व्यक्तीने म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह्य भाषेत टिकाटिप्पणी केली. त्यामुळे लाखो गांधी अनुयायांच्या भावना दुखावल्याची तक्रार नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस गृपच्या वतीने संदेश सिंगलकर, प्रज्वला तट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदवली. जोशीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी या तक्रारीतून उपरोक्त ग्रूपच्या सदस्यांनी केली आहे. पुरावा म्हणून तक्रारीसोबत फेसबुकवरील आक्षेपार्ह्य पोस्टचा स्क्रीन शॉटची कॉपीही जोडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत फेसबुकवरील पोस्टची शहानिशा करण्यासाठी सायबर शाखेची मदत घेतली आहे. सायबर शाखेकडून मिळालेल्या अभिप्रायानंतरच या प्रकरणात पुढची कारवाई करण्यात येईल, असे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले आहे.