शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:19 IST

अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.

ठळक मुद्देरथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्रा आसनस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.भगवानाच्या रथाच्या स्वागतासाठी मार्ग मोकळा करीत भाविक पुढे जात होते. सोबतच गंगाजलाने वातावरण शुद्ध करण्यात येत होते. भव्य आणि सुशोभित केलेल्या रथावर पुरोहित भगवानाची सेवा करीत होते. मार्गात पुष्पवृष्टी करून भगवानाचे स्वागत करण्यात आले. कुकडे ले-आऊटच्या विविध मार्गाने रथयात्रा समाज भवनात पोहोचली. येथे भगवानाची पूजा करून त्यांची मूळ स्थानी स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी भवनात भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राच्या सोबत चक्र सुदर्शनची मूळ स्थानावर पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांना बाहेर आणण्यात आले. येथे अभिषेक व पूजनानंतर त्यांना रथावर स्थापन करण्यात आले. रथावर स्थापना केल्यानंतर पुन्हा भगवानाची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर रथाला ओढण्यात आले. मार्गात भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी जय जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, हरि बोल हरि बोलच्या कीर्तनांवर भाविक थिरकताना दिसले. संस्थेचे अध्यक्ष अनुप सत्पती यांनी सांगितले की, उपनिषद आणि पुराणात शरीराला रथ संबोधण्यात आले आहे. जेव्हा या शरीररुपी रथात बसलेल्या आत्मारुपी सारथीच्या मदतीने मनाला आवर घालून इंद्रियरुपी घोड्यांना श्रेष्ठ मार्गाकडे वाटचाल करतो तेव्हा हा रथ आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. प्रभुची कृपा सर्वांवर समान रूपाने होते. आमच्या जीवनाचा रथ गतिमान असला पाहिजे. आम्ही आपल्या जीवनाला गतिमान करून राष्ट्र, समाज आणि आत्मोन्नतीसोबत मानवतेची सेवा केली पाहिजे. हीच भगवानाची सर्वात मोठी सेवा आहे. हाच रथयात्रेचा संदेश आहे. यशस्वितेसाठी उपाध्यक्ष एस. एच. नंदा, सचिव एस. दास, गणेश दास, पी. पी. मिश्रा यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर