ओढणीने घेतला बहिणीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST2021-06-05T04:07:31+5:302021-06-05T04:07:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : भावासाेबत माेटारसायकलवर माहेरी येत असलेल्या बहिणीची ओढणी अनावधानाने माेटारसायकलच्या मागच्या चाकात अडकली आणि ती ...

Odhani took her sister's life | ओढणीने घेतला बहिणीचा जीव

ओढणीने घेतला बहिणीचा जीव

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : भावासाेबत माेटारसायकलवर माहेरी येत असलेल्या बहिणीची ओढणी अनावधानाने माेटारसायकलच्या मागच्या चाकात अडकली आणि ती राेडवर आदळली. त्यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-शिवनी मार्गावरील खानापूर शिवारात शुक्रवारी (दि. ४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

सीता हरिसिंग यादव (२९, रा. कातलवाडी, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे मृत बहिणीचे नाव आहे. जितू राजकुमार बोरकर (रा. रनाळा, ता. कामठी) हा सीताचा भाऊ असून, त्याला पहायला मुलीकडील मंडळी येणार असल्याने तो बहिणीला घ्यायला कातलवाडी येथे गेला हाेता. तो तिला घेऊन माेटरसायकलने (एमएच ४० बीयू ४०७८) कातलवाडीहून रनाळ्याला परत येत हाेता.

दरम्यान, खानापूर शिवारात सीताची ओढणी वेगात असलेल्या माेटारसायकलच्या मागच्या चाकात अडकली आणि ती राेडवर काेसळली. त्यात तिच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. त्याने लगेच पाेलिसांना सूचना देत तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तिला तपासणीअंती मृत घाेषित केले. आठवडाभरापूर्वी झालेल्या अपघातात ती थाेडक्यात बचावली हाेती, अशी माहिती जितू बाेरकर याने दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Odhani took her sister's life