खंडणी म्हणून दुकानावर कब्जा

By Admin | Updated: November 13, 2015 02:57 IST2015-11-13T02:57:29+5:302015-11-13T02:57:29+5:30

कुख्यात गुंडाच्या मदतीने खंडणी म्हणून दुकानावर कब्जा केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

Occupy the shop as a ransom | खंडणी म्हणून दुकानावर कब्जा

खंडणी म्हणून दुकानावर कब्जा

न्यायालयाने फेटाळला आरोपीचा अटकपूर्व जामीन
नागपूर : कुख्यात गुंडाच्या मदतीने खंडणी म्हणून दुकानावर कब्जा केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
सोनू ऊर्फ शेख रिजवान शेख रशीद, असे आरोपीचे नाव असून तो दहीबजार झाडे चौक येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, प्रेमनगर श्रीराम वाडी येथील मुरारी मानूलाल गुप्ता (५०) यांनी आरोपी शेख रिजवानचे वडील अब्दुल रशीद छोटे मियाँ (६०) याच्याकडून भाड्याने दुकान घेतले होते. यासाठी १ लाख ३० हजार रुपये पगडी दिली होती. दुकान सोडताना मुरारी गुप्ता यांनी आपली पगडीची रक्कम परत मागितली होती. त्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
९ आणि १२ आॅगस्ट २०१५ या दरम्यान शेख रिजवान याने आपल्या साथीदारांना एकत्र करून मुरारी गुप्ता यांना बांबूच्या काठीने जबर मारहाण केली होती. या घटनेनंतर कुख्यात गुंड वसीम चिऱ्या याने या प्रकरणात मध्यस्त करून देतो, असे गुप्ता यांना म्हटले होते. त्याने आपल्या साथीदारांसह गुप्ताच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पगडीचे पैसे परत करण्याऐवजी उलट खंडणी म्हणून गुप्ता जवळून दुकानाची चाबी हिसकावली होती. दुकानात परत आल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी गुप्ताच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी ६ आॅक्टोबर २०१५ रोजी रिजवान, वसीम चिऱ्या, छोटा वसीम, निसार, गोलू, अय्याज, बाशीद पटेल सर्व रा. शांतीनगर यांच्याविरुद्ध भादंविच्या ३८४, ३८६, २९४, १४१, १४३, १४५, १४७, १४९ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्या पैकी शेख रिजवान याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता तो न्यायालयाने फेटाळला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. निकम हे तपास अधिकारी आहेत.

Web Title: Occupy the shop as a ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.