मुलाखतीच्या निमित्ताने मनसे करणार चाचपणी

By Admin | Updated: August 23, 2014 03:11 IST2014-08-23T03:11:15+5:302014-08-23T03:11:15+5:30

विदर्भात पक्षाची विशेष ताकद नसतानाही खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी येत असल्याने त्यांच्या दौऱ्यामागचे ...

On the occasion of interview, | मुलाखतीच्या निमित्ताने मनसे करणार चाचपणी

मुलाखतीच्या निमित्ताने मनसे करणार चाचपणी

नागपूर: विदर्भात पक्षाची विशेष ताकद नसतानाही खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी येत असल्याने त्यांच्या दौऱ्यामागचे राजकीय गणित नेमके काय याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पक्षाची शक्ती असलेल्या भागातच निवडणुकीच्या काळात अधिक लक्ष केंद्रित करण्याचे मनसेचे आजवरचे निवडणूक धोरण राहिले आहे. ते पाहता विदर्भात पक्षाची विशेष शक्ती नसताना राज ठाकरे मुलाखतीसाठी येणे हे अनाकलनीय आहे. राज यांचे प्रत्येक पाऊल हे राजकीय फायदा-तोटा लक्षात घेऊनच टाकले जाते. त्यामुळेच वरवर जरी ते मुलाखती घेण्यासाठी नागपूरमध्ये येत असले तरी यामागे त्यांचे निश्चित काही आडाखे असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये शिवसेनेच्या वाट्याला सहापैकी फक्त एक जागा आहे तर १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा नाही.
मात्र या दोन्ही पक्षांकडे सर्वच मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे मनसेकडे उमेदवार नाहीत. दुसरीकडे भाजप आणि मनसेची छुपी मैत्री जगजाहीर आहे.
मनसेच्या माध्यमातून भाजप सेनेचा ‘गेम’ करू शकते. भाजपने यापूर्वीच नागपूरमध्ये ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा दिला आहे. इतर पक्षातील इच्छुक गळाला लागतात का याचीही चाचपणी राज घेऊ शकतात. त्यामुळे रविवारी मनसेच्या मुलाखतीला कोण जाते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. विशेषत: सेना याबाबत अधिक दक्ष राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज ठाकरे शनिवारी रात्री मुंबईहून नागपूरला येत आहेत. त्यांच्यासोपबत आमदार बाळा नांदगावकर आणि आमदार प्रवीण दरेकर येणार आहेत. रविवारी रविभवनात ते विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेतील. (प्रतिनिधी)

Web Title: On the occasion of interview,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.