शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील हावभाव गुन्हाच, पण तक्रारीत वर्णन हवे; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:14 IST

गुन्ह्याचे निकष पूर्ण होण्यासाठी कोणत्या प्रकारचे अश्लील हावभाव केले गेले, याचे वर्णन सांगणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील हावभाव करणे गुन्हाच आहे. परंतु या गुन्ह्याचे निकष पूर्ण होण्यासाठी कोणत्या प्रकारचे अश्लील हावभाव केले गेले, याचे वर्णन सांगणे आवश्यक आहे. आरोपीने अश्लील हावभाव केले, केवळ एवढीच तक्रार करणे पुरेसे नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका निर्णयात स्पष्ट केले.

न्यायमूर्तीद्वय विनय जोशी व अभय मंत्री यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अकोला येथील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी हेडकॉन्स्टेबल सुनील खापरे यांच्या तक्रारीवरून अक्षय पंजाब चव्हाण (२४) व अभिजित अवतार तायडे (२६) या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध भादंवि कलम ५०९ (अश्लील हावभाव करणे) अंतर्गत एफआयआर दाखल केला होता. विद्यार्थ्यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी शास्त्रीनगरमधील एका अपार्टमेंटसमोर उभ्या असलेल्या महिलांकडे पाहून अश्लील हावभाव केले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांची याचिका करण्यात आली मंजूर

- महिलेच्या विनयभंग प्रकरणामध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी नेमके कोणत्या प्रकारचे अश्लील हावभाव केले, याचे वर्णन तक्रारीमध्ये केले गेले नाही.- करिता, न्यायालयाने वरील बाब स्पष्ट करून हा वादग्रस्त एफआयआर रद्द करण्याची आरोपी विद्यार्थ्यांची याचिका मंजूर केली.- या गुन्ह्यामध्ये तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. आरोपी विद्यार्थ्यांच्या वतीने ॲड. स्वप्नील वानखेडे यांनी कामकाज पाहिले.

अक्षयला लष्कराचे ‘कॉल लेटर’

- अक्षय चव्हाणला सैनिक व्हायचे असून, त्याला भारतीय लष्कराचे ‘कॉल लेटर’ आले आहे. ॲड. वानखेडे यांनी हे ‘कॉल लेटर’ न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करून हा गुन्हा कायम राहिल्यास अक्षयला नोकरी गमवावी लागेल व याचा परिणाम त्याच्या भविष्यावरही होईल, असे न्यायालयाला सांगितले.  - याशिवाय, केरळ उच्च न्यायालयाचा समान मुद्यावरील निर्णय दाखवून हा गुन्हा अवैध असल्याचे सिद्ध केले.

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालयMumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ