शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

उपमुख्यमंत्री फडणवीस न्यायालयात हजर, लेखी स्वरूपात दिली माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 20:59 IST

यावेळी कोर्ट परिसरात झालेली गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

नागपूर : निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्या प्रकरणात प्रतिवादी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे शनिवारी उपस्थित झाले. तब्बल सव्वातास ते कोर्टात हजर होते. यावेळी कोर्ट परिसरात झालेली गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी ॲड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली होती. या तक्रारीवरील गेल्या सुनावणीदरम्यान उके यांच्या बाजूने युक्तिवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रतिवादीला न्यायालयात बयानासाठी उपस्थित राहावे लागते. त्यामुळे, फडणवीस यांना शनिवारी १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागणार होते. त्यानुसार, ते उपस्थित राहिले. न्यायालयाने त्यांचे बयान नोंदविले. त्यांनी लेखी स्वरूपात आपले बयान सादर केले. न्यायालयात त्यांच्या बाजूने ॲड. देवेन चव्हाण आणि ॲड. उदय डबले यांनी बाजू मांडली. या प्रकरणी ६ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

फडणवीसांचे वकील म्हणाले रेग्युलर प्रोसिजर !या प्रकरणात कोर्टापुढे आतापर्यंत जे साक्षीपुरावे झाले, त्या संबंधाने न्यायालयाने फडणवीस यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांवर तुमचे काय मत आहे, काय उत्तर आहे, अशी विचारणा केली. कोर्टाची ही रेग्युलर प्रोसिजर असते, फडणवीसांचे वकील ॲड. उदय डबले यांनी पत्रकारांना सांगितले. यातील एकही गुन्हा आपल्याला मान्य नाही. राजकीय वैमनस्यातून आणि राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन हे सगळे खोटे आरोप आपल्यावर लावण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टात म्हटल्याची माहितीही ॲड. डबले यांनी पत्रकारांना दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCourtन्यायालयBJPभाजपाnagpurनागपूर