शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:06 IST

नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा : उपराजधानी झाली जाम, ‘आरक्षण बचाव’च्या घोषणा देत व्यक्त केली खदखद, २ सप्टेंबरचा तो शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महायुती सरकारने २ सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजात किती प्रचंड खदखद आहे, याचे प्रत्यंतर शुक्रवारी येथे ओबीसी बांधवांनी काढलेल्या आरक्षण बचाव महामोर्चात पहायला मिळाले. ये तो सिर्फ झाँकी है... ओबीसींकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईच नव्हे तर पुणे, ठाणे जाम करू, असा इशारा या मोर्चातून देण्यात आला.

मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले. यामुळे नागपूर शहर पूर्णत: जाम झाले होते. राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने यशवंत स्टेडियम येथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. जय ओबीसी, जय संविधान, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा पंचशील चौक, व्हेरायटी चौक येथून संविधान चौकात आला. त्यानंतर सभा झाली. यावेळी विविध नेत्यांनी भाषणात २ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली. 

या मोर्चात प्रशांत पडोळे, प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे हे खासदार तसेच  आमदार अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, आ. रामदास मसराम, बाळासाहेब मांगरुळकर, शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख, माजी आमदार सुनील केदार, माणिकराव ठाकरे,  रासपचे महादेव जानकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, रवींद्र दरेकर, उमेश कोरराम, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे आदी सहभागी झाले होते.

वडेट्टीवार भुजबळांच्या आहारी गेले, जरांगे यांची टीकावडीगोद्री (जि. जालना)  : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे छगन भुजबळांच्या पूर्णपणे आहारी गेले असून, त्यांचे सर्व बोल भुजबळांचेच असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसणार नाहीत, असा पलटवार त्यांनी केला.नागपुरात झालेल्या ओबीसींच्या मोर्चानंतर वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले की, वडेट्टीवार चांगला माणूस होता, विरोधी पक्षनेता होता; पण आता तो नाशिकच्या षड्यंत्रात गुंतला आहे. 

नागपूरधील मोर्चा राजकीय स्वार्थासाठी होता. तो काँग्रेस पक्षाचा मोर्चा होता. तो राहुल गांधींच्या सांगण्यावरून झाल्याचे जरांगे म्हणाले. अनिल देशमुख यांच्यासारख्या नेत्यांमुळे शरद पवारांच्या प्रतिमेला डाग लागतो. सध्या विविध राजकीय पक्षांकडून ओबीसींना खेचण्यासाठी प्रयोग सुरू आहेत, त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्येच स्पर्धा लागल्याचे जरांगे म्हणाले.

‘तेलंगणाप्रमाणे आरक्षण द्या’ : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे सरकार म्हणत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे घुसखोरी होत आहे. तेलंगणा सरकारप्रमाणे ४२% आरक्षण द्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : OBC Protest Erupts: Threat to Block Mumbai, Pune if Neglected!

Web Summary : OBC community's massive protest in Nagpur against government's decision. Leaders warn of blocking major cities if OBC demands are ignored. Manoj Jarange criticizes Congress leader Vijay Wadettiwar and alleges political motives behind the protest. Demands for Telangana-like 42% OBC reservation raised.
टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षण