नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगला; पोलिसांनी रितीकला तुरुंगात टाकला
By दयानंद पाईकराव | Updated: December 26, 2023 15:32 IST2023-12-26T15:32:08+5:302023-12-26T15:32:35+5:30
आरोपी रितीकविरुद्ध कलम ३३६, १८८, सहकलम ५, १५, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगला; पोलिसांनी रितीकला तुरुंगात टाकला
नागपूर : नायलॉन मांजाच्या ३५ चक्री विक्रीसाठी बाळगणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. रितीक राजाराम शाहु (वय २३, रा. वृंदावननगर, शाहु मोहल्ला, यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कळमना पोलिसांचे पथक सोमवारी २५ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांनी मेहता काटा ते चिखली चौक जाणाºया रोडवर फायर ब्रिगेडच्या ऑफीसमागे आरोपी रितीकला त्याची अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ४९, बी. एस-४०८७ सह ताब्यात घेतले. तो शासनाने प्रतिबंधीत केलेल्या नायलॉन मांजाच्या ३५ चक्री विक्रीसाठी घेऊन जाताना आढळला. त्याच्याकडून दुचाकी व नायलॉन मांजा असा ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी रितीकविरुद्ध कलम ३३६, १८८, सहकलम ५, १५, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.