एनव्हीसीसीचे ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST2021-03-28T04:09:18+5:302021-03-28T04:09:18+5:30
नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे होळीनिमित्त मंगळवार, ३० रोजी सायंकाळी ६ वाजता अखिल भारतीय हास्य कवी संमेलन ...

एनव्हीसीसीचे ऑनलाइन
नागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे होळीनिमित्त मंगळवार, ३० रोजी सायंकाळी ६ वाजता अखिल भारतीय हास्य कवी संमेलन ‘रंगों भरी शाम, कवियों के नाम’चे ऑनलाइन आयोजन करण्यात येणार आहे. चेंबरचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया म्हणाले, कोविड महामारी आणि लॉकडाऊनमुळे व्यापारी आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करीत आहेत. होळी सण रंगाचा आणि हसणे व हसविण्याचा आहे. ही बाब ध्यानात ठेवून चेंबरने होळीनिमित्त व्यापाऱ्यांसाठी ऑनलाइन फेसबुक हास्य कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. चेंबरचे उपाध्यक्ष व मनोरंजन उपसमितीचे संयोजक अर्जुनदास आहुजा म्हणाले, संमेलनात हास्य व्यंग कवी घनश्याम अग्रवाल (अकोला), दिनेश देहाती (बालाघाट), दीपक दनादन (भोपाल), प्रा. मनीष बाजपेयी (कामठी), परोडीकार आनंदराज आनंद (चंद्रपूर) आदी आपल्या कविता आणि हास्य व्यंग रचनांनी श्रोत्यांना हसवतील.