शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध ‘नुटा’चे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:39 IST

महाराष्ट्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरुद्ध सोमवारी नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा) व महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरुद्ध सोमवारी नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा) व महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. संघटनेचा आरोप आहे की, शासनाने भारतीय राज्यघटनेच्या कलम २४६ चे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्र शासनाने कोणताही अधिकार नसताना बरीच तोडफोड करून शासन निर्णय निर्गमित केला आहे. प्राध्यापकांच्या हिताच्या बाबी शासनाने आपल्या निर्णयात कायम ठेवल्या नाहीत. केंद्र सरकारचे अनुदान मिळणार असतानाही शर्ती आणि शिफारशीमध्ये मोडतोड केली आहे. यासह प्राध्यापकांच्या वेतन थकबाकीसंदर्भात, एम.फिल., पीएच.डी. प्राप्त शिक्षकांना उत्तेजनार्थ वेतनवाढीसंदर्भात, उपप्राचार्यपद नाकारण्यासंदर्भात अन्याय केला आहे. शासनाने लगेच तोडगा न काढल्यास येत्या २४ जून रोजी उच्च शिक्षण संचालक पुणे यांच्या कार्यालयावर राज्यस्तरीय मोर्चा व १ जुलै रोजी आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला. आंदोलनात डॉ. अजित जाचक, डॉ. विलास ढोणे, डॉ. कार्तिक पन्नीकर, डॉ. अश्विन चंदेल, डॉ. विवेक चव्हाण, डॉ. रमेश इंगोले, डॉ. प्रदीप भानसे, डॉ. विकास बेले, डॉ. अविनाश साहुरकर, डॉ. देवेंद्र पुनसे, डॉ. दिगंबर कापसे, डॉ. अविनाश अणे, डॉ. विलास डोईफोडे, प्रा. दमयंती घागरगुंडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन