अमेरिकेत निनादणार नागपूरचे स्वर

By Admin | Updated: August 14, 2016 02:51 IST2016-08-14T02:51:33+5:302016-08-14T02:51:33+5:30

अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनायटेड नेशन) सभागृहात येत्या १५ आॅगस्ट रोजी सांस्कृतिक..

Nunadeen Nagpur Vocal in America | अमेरिकेत निनादणार नागपूरचे स्वर

अमेरिकेत निनादणार नागपूरचे स्वर

संयुक्त राष्ट्रसंघात होणार कार्यक्रम : ए.आर. रहमानसोबत दिनेश राहाटे गाणार देशभक्तिपर गीत
नागपूर : अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनायटेड नेशन) सभागृहात येत्या १५ आॅगस्ट रोजी सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नागपूरचे दिनेश राहाटे हे देशभक्तिपर गीत सादर करतील. सुप्रसिद्ध गायक व संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबत त्यांना येथे गाण्याची संधी मिळाली असून ते रहमान यांच्यासोबत अनेक सुफी व देशभक्तीपर गीत सादर करतील. दिवंगत संगीतकार व गायक एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपतीनगर येथील रहिवासी दिनेश यांनी चेन्नई येथे ए.आर. रहमान यांनी स्थापन केलेल्या के.एम कॉलेज आॅफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते २००९ पासून ए.आर. रहमान यांच्याशी जुळले आहेत. यापूर्वी ते रहमान यांच्यासोबत दुबईमध्ये आयोजित तीन कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभागी झाले होते.
न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध गायक जावेद अली हे सुद्धा रहमान यांच्यासोबत असतील. सुफी गीतांमध्ये आवड असल्यामुळे दिनेश ए.आर. रहमान यांच्या ग्रुपशी जुळले. मदुरै सुब्बुलक्ष्मी कर्नाटकच्या प्रसिद्ध संगीतकार व गायक होत्या. त्या सर्वात पहिल्या भारतीय होत्या, ज्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत कार्यक्रम सादर केला होता. यात ए.आर. रहमान यांचा दुसरा क्रमांक लागतो. (प्रतिनिधी)

‘अल्लाह’पर्यंत पोहोचणारा आवाज
दिनेशचे भाऊ कमलेश रहाटे यांनी सांगितले की, ३२ वर्षीय दिनेश यांनी ‘रांझना’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्यात आपला आवाज दिला आहे. त्यांना आता एका चांगल्या संधीची प्रतीक्षा आहे. ए.आर. रहमान यासारख्या प्रसिद्ध गीतकाराशी जुळून ते गीत सादर करीत आहे. दिनेशा आवाज रहमान यांच्या आईला खूप आवडतो. त्या नेहमी म्हणत असतात की, दिनेशचा आवाज ‘अल्लाह’पर्यंत पोहोचणारा वाटतो.

 

Web Title: Nunadeen Nagpur Vocal in America