विदर्भात बाधितांची संख्या १,७४,४५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:19 PM2020-10-16T22:19:39+5:302020-10-16T22:21:16+5:30

Corona Positive Cases , Vidarbha News विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येची गती मंदावली आहे. रोज तीन हजारावर होत असलेल्या रुग्णांची नोंद १५०० वर आली आहे. मात्र, मागील दोन आठवड्यापासून ही रुग्णसंख्या कायम आहे.

The number of victims in Vidarbha is 1,74,458 | विदर्भात बाधितांची संख्या १,७४,४५८

विदर्भात बाधितांची संख्या १,७४,४५८

Next
ठळक मुद्देमृतांची संख्या ४,७५१ : १,५०३ रुग्ण व ४५ मृत्यूची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येची गती मंदावली आहे. रोज तीन हजारावर होत असलेल्या रुग्णांची नोंद १५०० वर आली आहे. मात्र, मागील दोन आठवड्यापासून ही रुग्णसंख्या कायम आहे. शुक्रवारी १,५०३ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची १,७४,४५८ वर पोहचली आहे. ४५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४,७५१ झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज ६७४ रुग्ण व २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ८९,७६१ तर मृतांची संख्या २,९१२ वर गेली. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात दिसून आले. १३७ रुग्ण व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १३,०८२ तर मृतांची संख्या १९७ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ११८ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ८,०५९ वर पोहचली. अमरावती जिल्ह्यात ११९ रुग्ण व चार मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १५,३०९ झाली असून मृतांची संख्या ३४७ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात १०४ रुग्ण आढळून आले तर सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांची संख्या ७,२९६ तर मृतांची संख्या १८५ झाली. यवतमाळ जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली. १०२ रुग्ण पॉझिटिव्ह तर चार रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ९,३८८ तर मृतांची संख्या ३०३ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ७२ रुग्ण व तीन मृत्यूची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात ६३ रुग्णांची भर पडली. वाशिम जिल्ह्यात ९२ रुग्ण व चार रुग्णांचे मृत्यू तर अकोला जिल्ह्यात २२ रुग्ण व दोन रुग्णांचे बळी गेले.

Web Title: The number of victims in Vidarbha is 1,74,458

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.