शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात रुग्णांची संख्या ६९ हजारावर; २९२३ नवे रुग्ण तर ६४ मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 21:45 IST

विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत चालला आहे. शनिवारी २९२३ नव्या रुग्णांची भर पडली तर ६४ मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्देनागपुरात १७४१ पॉझिटिव्हसात जिल्ह्यात रुग्णांनी गाठली शंभरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत चालला आहे. शनिवारी २९२३ नव्या रुग्णांची भर पडली तर ६४ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ६९७०३ झाली असून मृतांची संख्या १९१७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज नागपुरात पुन्हा १७०० वर रुग्णांची संख्या गेली. सात जिल्ह्यात रुग्णांनी शंभरी गाठली. यात पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून रोजच्या रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळ जात आहे. आज १७४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या ३८१३९ तर मृतांची संख्या १२६१ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. रुग्णसंख्य ३६४१ झाली असून मृतांची संख्या ४१ वर गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा भयावह पद्धतीने वाढत आहे.

आज सात मृत्यू व १३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची एकूण संख्या ४०६३ तर मृतांची संख्या ११५ झाली आहे. अकोला जिल्ह्यात १२७ रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्णाचे बळी गेले. रुग्णसंख्या ४५११ वर पोहचली आहे. आतापर्यंत १६५ बळी गेले आहेत. वर्धा जिल्ह्यात १४० रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. रुग्णसंख्या १६०२ झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात १३८ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची संख्या १८८४ तर मृतांची संख्या ३३ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही मृतांची संख्या वाढत आहे. आज चार मृत्यू व १४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ३७५२ झाली असून मृतांची संख्या ५७ वर गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात १५९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या २१८६ झाली तर एका रुग्णाच्या मृत्यूने बळींची संख्या २८ झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात ७१ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ६५८० झाली आहे. वाशिम जिल्ह्यात ४४ रुग्ण तर गडचिरोली जिल्ह्यात २३ नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस