शहरात वाढले ७१४०, तर ग्रामीणमध्ये ३००८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:32+5:302021-07-18T04:07:32+5:30
नागपूर : कोरोनाचे लपविलेले आकडे शुक्रवारी पुढे येताच खळबळ उडाली. त्यानुसार शहरात ७१४० रुग्ण व ५९१ मृत्यू वाढले असून, ...

शहरात वाढले ७१४०, तर ग्रामीणमध्ये ३००८ रुग्ण
नागपूर : कोरोनाचे लपविलेले आकडे शुक्रवारी पुढे येताच खळबळ उडाली. त्यानुसार शहरात ७१४० रुग्ण व ५९१ मृत्यू वाढले असून, ग्रामीणमध्ये ३००८ रुग्ण व २९५ मृतांची भर पडली आहे. शनिवारी १४ नवे रुग्ण आढळून आले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,७४२, तर मृतांची संख्या १०११५ वर पोहोचली आहे. सध्या कोरोनाचे ३१० सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे धोका कायम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर जिल्ह्यात शनिवारी ८५७८ चाचण्या झाल्या. यात शहरातील ७१६४, तर ग्रामीणमध्ये १४१४ झाल्या. जिल्हाचा पॉझिटिव्हिटीचा दर ०.१६ टक्के, शहरात हाच दर ०.१३ टक्के, तर ग्रामीणमध्ये ०.२८ टक्के होता. शहरात १०, तर ग्रामीणमध्ये ४ रुग्ण आढळून आले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,३९,८९० व मृत्यूची संख्या ५८९१ झाली आहे. ग्रामीणमध्ये १,४६,०५८ रुग्ण व २६०३ मृत्यूची संख्या पोहोचली आहे. १७ बाधित रुग्ण बरे झाले; परंतु नव्या नोंदीमुळे रुग्णांची संख्या वाढल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर ९८ टक्क्यांवरून ९७.८८ टक्क्यांवर आला आहे.
- कोरोनाचे ३०१ रुग्ण सक्रिय
सक्रिय रुग्णांची संख्या गुरुवारी १११ असताना शुक्रवारी २०२ ने वाढली. शनिवारी ही संख्या ३१० झाली. यातील १०० रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत, तर २१० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
: कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ८५७८
शहर : १० रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ४ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,९२,७४२
एकूण सक्रिय रुग्ण : ३१०
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,३१७
एकूण मृत्यू : १०,११५