कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:08 IST2021-03-24T04:08:44+5:302021-03-24T04:08:44+5:30
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या एक लाख रुग्णांचा टप्पा गाठण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागला. परंतु, दुसऱ्या एक लाख रुग्णांचा टप्पा ...

कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांजवळ
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या एक लाख रुग्णांचा टप्पा गाठण्यास आठ महिन्यांचा कालावधी लागला. परंतु, दुसऱ्या एक लाख रुग्णांचा टप्पा पाच महिन्यातच गाठत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी ३,०९५ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकट्या मार्च महिन्यात ४९,९८३ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,९९,७७१ वर पोहचली. ३३ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४,६९७ झाली.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या चिंतेचे वातावरण दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. मागील सात दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांवर जात आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली. १४,९५६ चाचण्या झाल्या. यात ११,३७९ आरटीपीसीआर तर ३,५७७ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश होता. या चाचण्यांच्या तुलनेत २०.६९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत २,१३६ ने वाढ झाली. आतापर्यंत १,६३,०८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर गेला असताना आज तो ८१ टक्क्यांवर आला आहे.
- शहरात २,२७२ तर, ग्रामीणमध्ये ८१९ रुग्ण पॉझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी नोंद झालेल्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील २,२७२ तर ग्रामीणमधील ८१९ रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये शहरातील १९ तर ग्रामीणमधील १० मृत्यू होते. जिल्ह्याबाहेरील ४ रुग्ण व ४ मृत्यू होते. शहरात आतापर्यंत १,५८,७२० रुग्ण व ३,००६ मृत्यूची तर, ग्रामीणमध्ये ४०,०४३ रुग्ण व ८६५ मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्याबाहेरील बाधितांच्या संख्येनेही हजाराचा आकडा ओलांडला. १००८ रुग्ण व ८२६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
-कोरोनाचे ३१,९९३ रुग्ण सक्रिय
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत आता गंभीर रुग्णांची भर पडत चालल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. सध्याच्या स्थितीत ३१,९९३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील २४,६६२ तर ग्रामीणमधील ७,३३१ रुग्ण आहेत. ६,९५१ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. २५,०४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
- असा वाढला कोरोनाबाधितांचा ग्राफ
मार्च १६
एप्रिल १३८
मे ५४१
जून १,५०५
जुलै ५,३९२
ऑगस्ट २९,५५५
सप्टेंबर ७८,०१२
ऑक्टोबर १,०२,७८६
नोव्हेंबर १,११,७६५
डिसेंबर १,२३,७६७
जानेवारी १,३४,२७४
फेब्रुवारी १,४९,७८८
मार्च १,९९,७७१
(२३ पर्यंत)
कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या : १४,९५६
ए. बाधित रुग्ण :१,९९,७७१
सक्रिय रुग्ण : ३१,९९३
बरे झालेले रुग्ण :१,६३,०८१
ए. मृत्यू : ४,६९७