CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या ४०६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:57 PM2020-05-21T23:57:16+5:302020-05-22T00:01:33+5:30

सलग चौथा लॉकडाऊन सुरू असतानाही नव्या रुग्णांची भर पडतच चालली आहे. गुरुवारी १९ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ४०६ वर पोहचली असून ५०० कडे वाटचाल सुरू झाली आहे.

The number of corona patients in Nagpur is 406 | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या ४०६

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या ४०६

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलग चौथा लॉकडाऊन सुरू असतानाही नव्या रुग्णांची भर पडतच चालली आहे. गुरुवारी १९ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ४०६ वर पोहचली असून ५०० कडे वाटचाल सुरू झाली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा, गोळीबार चौक व गड्डीगोदाम येथून रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. काहीशी दिलासादायक बाब म्हणजे, आज नऊ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३१२ झाली आहे. विदर्भात आता सर्वच जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. यात नागपूरही मागे नाही. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात आठ नमुने पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण मोमिनपुरा येथील आहेत. यात १०, १३, ३०, ३२, ३४, ५० वर्षीय पुरुष तर ५ वर्षाची चिमुकली व ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण सिम्बॉयसीस येथे क्वारंटाईन होते. माफसुच्या प्रयोगशाळेत गोळीबार चौक येथील ५४ वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होता. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. तीन मोमिनपुरा तर सात गड्डीगोदाम येथील आहेत. यात १२, १२, १८, ५२, ३०, ३२, ३४, ७३ वर्षीय पुरुष तर ३२ व ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील तीन रुग्ण आमदार निवासात तर सात रुग्ण व्हीएनआयटीमध्ये दाखल होते.

१६ वर्षांखालील पाच रुग्ण
आज नोंद झालेल्या १९ रुग्णांमध्ये १६ वर्षांखालील पाच रुग्णांची नोंद झाली. यात मोमिनपुरा येथील पाच वर्षांची मुलगी, १०, १२, १२ व १३ वर्षाचा मुलांचा समावेश आहे. या पाचही रुग्णांना लक्षणे नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आई-वडिलांकडून यांना लागण झाल्याचे सांगण्यात येते.

मेयोतून आठ तर मेडिकलमधून एक रुग्ण डिस्चार्ज
मेयोतून आज आठ रुग्णांना सुटी (डिस्चार्ज) देण्यात आली. यात सतरंजीपुरा येथील दोन तर मोमिनपुरा येथील तीन पुरुष आहेत. या शिवाय मोमिनपुरा येथील तीन महिला आहेत. या सर्वांकडून पुढील सात दिवस सक्तीने घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे. चंद्रपूर येथील ५० वर्षीय रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत होते त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मेडिकलमध्ये लक्षणे नसलेले ४२ रुग्ण
ज्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे व इतर गंभीर आजार नाहीत, त्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचे सुधारित मार्गदर्शक तत्त्वे आहेत. परंतु नागपुरात कोविड केअर सेंटरच नसल्याने आयसीयू, एचडीयू सारख्या वॉर्डात लक्षणे नसलेली रुग्ण उपचार घेत आहेत. विशेषत: मेडिकलमध्ये ४७ रुग्ण भरती असून यातील ४२ रुग्णांना लक्षणेच नाहीत. केवळ पाच रुग्णांना लक्षणे आहेत. हे सर्व रुग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ९०
दैनिक तपासणी नमुने ५९९
दैनिक निगेटिव्ह नमुने ५८०
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४०६
नागपुरातील मृत्यू ०७
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३१२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,२६५
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८६९
पीडित-४०६-दुरुस्त-३१२-मृत्यू-७

Web Title: The number of corona patients in Nagpur is 406

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.