नाभिक एकता मंचचाही रक्तदानात पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:28+5:302021-07-18T04:07:28+5:30

नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन नाभिक एकता मंच, सलून पार्लर असोसिएशनने पुढाकार घेत रक्तदान ...

Nuclear Solidarity Forum also initiates blood donation | नाभिक एकता मंचचाही रक्तदानात पुढाकार

नाभिक एकता मंचचाही रक्तदानात पुढाकार

नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन नाभिक एकता मंच, सलून पार्लर असोसिएशनने पुढाकार घेत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. दारोडकर चौकातील श्री संत नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात जीएमसी ब्लड बँकेच्या सहकार्याने शनिवारी हे शिबिर पार पडले.

अध्यक्षस्थानी डॉ. सुनील अतकर होते. केशशिल्पी मंडळाचे माजी अध्यक्ष बंडू राऊत यांच्या हस्ते संत नगाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. यावेळी आयकर अधिकारी रवी कुकडे, संस्थापक-मार्गदर्शक नाना कुकडकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नागपूर अध्यक्ष सतीश तलवारकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मामा राऊत, कर्मचारी मंचचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ससनकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल कान्होलकर, महिला मंचच्या अध्यक्ष सुनीता खेडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

बंडू राऊत यांनी या आयोजनाबद्दल कौतुक केले. रक्ताची गरज ओळखून लोकमतने हाती घेतलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन नाभिक एकता मंचने आपली सामािजक बांधिलकी जोपासली, असे ते म्हणाले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन विकास लाखे यांनी तर आभार नाभिक एकता मंचाचे संस्थापक-अध्यक्ष धनराज कुकडकर यांनी मानले. यावेळी वर्धा जिल्हाध्यक्ष प्रशांत राजूरकर, वर्धा महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता राजूरकर, नागपूर महिला जिल्हाध्यक्ष भाग्यलता तळखंडे, अमोल आंबुलकर, राजू तळखंडे, दिलीप देशकर, विक्की साळवे, कमलेश पांडे, संतोष वैद्य, विजय लक्षणे, संजय मानकर,संजय चांदेकर, दयानंद ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Nuclear Solidarity Forum also initiates blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.