‘एनएसजी आॅपरेशन @ वन एएम’

By Admin | Updated: February 18, 2015 02:36 IST2015-02-18T02:36:29+5:302015-02-18T02:36:29+5:30

अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावर उपराजधानी नागपूरचे महत्त्व वाढत असल्याने शहराच्या सुरक्षेवरही अधिक लक्ष दिले जात आहे. याचा प्रत्यय सोमवारी मध्यरात्री

'NSG Operation @ One AM' | ‘एनएसजी आॅपरेशन @ वन एएम’

‘एनएसजी आॅपरेशन @ वन एएम’

आशिष दुबे  नागपूर
अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावर उपराजधानी नागपूरचे महत्त्व वाढत असल्याने शहराच्या सुरक्षेवरही अधिक लक्ष दिले जात आहे. याचा प्रत्यय सोमवारी मध्यरात्री ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’(एनएसजी)च्या ‘मॉकड्रील’च्या निमित्ताने आला.
अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आलेल्या ‘मॉकड्रील’ची रचना मोठ्या आॅपरेशनप्रमाणे तयार करण्यात आली होती. यात ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ (क्यूआरटी), शहर पोलीस दलातील निवडक अधिकारी, कर्मचारी, फायर ब्रिगेड आणि वाहतूक पोलिसांनाही सहभागी करण्यात आले होते. मात्र याबाबत अधिकृतपणे दुजोरा देण्यास कोणीही अधिकारी पुढे आला नाही. मंगळवारी ‘लोकमत’शी चर्चा करताना सूत्रांनी याबाबत माहिती दिली.
नागपूर देशाचे केंद्रबिंदू आहे. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे एनएसजी यापुढेही ‘मॉकड्रील’ व इतर प्रात्यक्षिकासाठी या शहराची निवड करू शकते. सोमवारी रात्री झालेल्या ‘मॉकड्रील’ची रूपरेषा दिल्लीस्थित एनएसजीच्या मुख्यालयी तयार करण्यात आली होती. यासंदर्भात गोपनीयता बाळगण्यात आली. एनएसजी शहराच्या इतर भागातही अशाप्रकारची ‘मॉकड्रील’ करू शकते. ती केव्हा आणि कुठे होणार याबाबत कुणालाच काहीही माहिती नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: 'NSG Operation @ One AM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.