आता वर्दळीच्या ठिकाणी मिळणार शिवभोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:22+5:302021-01-02T04:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याची योजना राज्य शासनाने ...

आता वर्दळीच्या ठिकाणी मिळणार शिवभोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. नागपूर शहरात एकूण १० शिवभोजन केंद्र मंजूर करून प्रारंभ करण्यात आलेला आहे. आता या शिवभोजन केंद्राचा विस्तार करीत नागपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येत आहे.
अजब बंगल्याजवळ, सिव्हील लाईन, दीक्षाभूमी, अजनी रेल्वे स्टेशन, मेडिकल चौक, सक्करदरा चौक, पारडी चौक, हसनबाग, खरबी चौक, चुंगी नाका नं. १३, कॉटन मार्केट, नेहरु पुतळा चौक इतवारी, इतवारी रेल्वे स्टेशन, महापालिका कार्यालयाजवळ सिव्हील लाईन, रेल्वे स्टेशन, राणी दुर्गावती चौक, इंदोरा चौक व कमाल चौक या वर्दळीच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र राहतील.
सक्षम खानावळी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांनी आपले अर्ज परिमंडळ कार्यालयात कार्यालयीन दिवशी १५ जानेवारी २०२१ पर्यंत जमा करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.