लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) यांनी 'नागपूर जल ग्राहक सेवा' हे मोबाइल अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याशी संबंधित विविध सेवा घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. त्यामुळे लांबच लांब रांगा लावणे किंवा कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
या अॅपद्वारे ग्राहकांना तक्रारी नोंदवता येतील आणि त्यांचा निपटारा ऑनलाइन पाहता येईल. तक्रार नोंदवल्यानंतर पूर्वीप्रमाणेच ती थेट नेटवर्क अभियंत्यांकडे पाठवली जाईल. अॅपमुळे बिलिंग आणि पेमेंट्स अधिक सुलभ झाले आहेत. ग्राहकांना पीडीएफ स्वरूपात बिल पाहता येईल आणि नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय तसेच वॉलेटद्वारे सहज पेमेंट करता येईल. पूर्वी ग्राहकांना नाव बदल, नळाचा आकार बदल आणि इतर सेवांसाठी झोन कार्यालयात जावे लागत असे, मात्र आता या सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
या अॅपमधून वापरकर्त्यांना लवकरच रिअल-टाइम नोटिफिकेशन्स, बिलिंग, सेवा अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे वेळोवेळी मिळतील. नागरिकांनी हे अॅप डाउनलोड करून जलद, सुलभ आणि सोयीस्कर पाणीसेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Web Summary : Nagpur citizens can now register water complaints and pay bills online using the 'Nagpur Jal Grahak Seva' app. Services like name changes and pipe size adjustments are also available. Real-time notifications and SMS updates will be provided for convenient water services.
Web Summary : नागपुर के नागरिक अब 'नागपुर जल ग्राहक सेवा' ऐप का उपयोग करके ऑनलाइन पानी की शिकायतें दर्ज कर सकते हैं और बिलों का भुगतान कर सकते हैं। नाम परिवर्तन और पाइप आकार समायोजन जैसी सेवाएं भी उपलब्ध हैं। सुविधाजनक जल सेवाओं के लिए रीयल-टाइम नोटिफिकेशन और एसएमएस अपडेट प्रदान किए जाएंगे।