शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गावातील छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी आता 'समाधान दिवस'ची संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:22 IST

प्रत्येक तक्रारीचे समाधान : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावातील लहान-मोठ्या तक्रारींबाबत वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद सामोपचाराने तत्काळ मार्गी लागू शकतात. यादृष्टीने आता प्रत्येक महिन्यात तिसऱ्या व चौथ्या बुधवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी समाधान दिवस म्हणून राबविण्यात येईल. या दिवशी प्रत्येक गावासाठी असलेल्या सजाच्या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक व गावपातळीवरील शासकीय कर्मचारी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीचे समाधान करतील. याचबरोबर जे शक्य होणारी कामे आहेत ती तत्काळ मार्गी लावतील, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केली.

जिल्ह्यातील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा परिषद व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. इटनकर म्हणाले, उत्तम प्रशासनाच्या मानकामध्ये गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक यांची कर्तव्यतत्परता ही अत्यंत महत्त्वाची असते. पाणंद रस्ते, फेरफार, पीककर्ज, संजय गांधी निराधार योजना व इतर निवडक योजना या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व तत्पर झाल्यास नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत. शासनातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्तव्याप्रती गंभीर असलेच पाहिजे. तलाठी व ग्रामसेवक यांच्या गावपातळीवर उपस्थितीबाबत लवकरच एक परिपत्रक निर्गमित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

तलाठ्यांना मार्गदर्शन

  • प्रधानमंत्री धरती आबा योजना, वनपट्टे यासारख्या आदिवासी विभागाच्या योजनांना अधिक गती देण्याचे त्यांनी सांगितले.
  • या कार्यशाळेत समाधान 3 दिवस, पाणंद रस्ते, अतिक्रमण मुक्त करणे, फेरफार अदालत व जिवंत सातबारा मोहीम, अॅग्री स्टॅक, पीककर्ज याबाबत उपस्थित तलाठ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
  • तहसीलदार कल्याणकुमार डहाट, सचिन कुमावत, राजू रणवीर यांनी मार्गदर्शन केले.
टॅग्स :nagpurनागपूरgram panchayatग्राम पंचायत