शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता चित्रनगरीसाठी प्रयत्न व्हायला हवे : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:04 IST

विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वैदर्भीय कलावंतांचा पुढचा प्रयत्न चित्रनगरीसाठी असायला हवा, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअ.भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वैदर्भीय कलावंतांचा पुढचा प्रयत्न चित्रनगरीसाठी असायला हवा, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला सिने अभिनेत्री व महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासह महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, अभिनेते भारत गणेशपुरे, वैभव तत्त्ववादी, कवी रामदास फुटाणे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, आ. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा सभापती नागेश सहारे, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर, राज कुबेर, प्रेमा किरण, समृद्धी पोरे, चैत्राली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले म्हणाले की, विदर्भातील मोठी मंडळी सिनेसृष्टीत काम करीत आहे. विदर्भात नवोदित कलावंतही मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्यासाठी महामंडळाचे विदर्भातील कार्यालय महत्त्वाचे ठरणार आहे. महामंडळाचे विदर्भात चित्रनगरी साकार करण्याचे स्वप्न आहे. विदर्भातील कार्यालयाकडून नक्कीच त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. विदर्भात गुणी कलावंत मोठ्या संख्येने आहेत. येथील भौगोलिक क्षेत्रसुद्धा सिनेमासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकांनी विदर्भात चित्रपटाची निर्मिती करून स्थानिक कलावंतांना संधी द्यावी, असे आवाहन वर्षा उसगावकर यांनी केले. विदर्भात चित्रपटाचे शुटींग झाले पाहिजे, चित्रपट निर्मितीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज असल्याचे मत भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी सांस्कृतिक धोरण समितीने चित्रनगरीचा प्रस्ताव शासनाला दिला होता, शासनानेही तो मान्य केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र दुरुगकर व रूपाली कोंडेवार - मोरे यांनी केले.

टॅग्स :cinemaसिनेमाnagpurनागपूर