आता ‘नो रिंग’, फक्त ‘ई-टेंडरिंग’
By Admin | Updated: May 13, 2014 00:57 IST2014-05-13T00:57:45+5:302014-05-13T00:57:45+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणार्या कंत्राट प्रणालीसाठी आता ‘ई-टेंडरिंग’चा उपयोग करण्यात येणार

आता ‘नो रिंग’, फक्त ‘ई-टेंडरिंग’
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणार्या कंत्राट प्रणालीसाठी आता विद्यापीठाचा पसारा फार मोठा असल्यामुळे निरनिराळ्या कामांसाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर कंत्राट प्रक्रिया राबवली जाते. यात प्रिंटिंग, कॅटरिंग, तांत्रिक बाबी, संगणक इत्यादी प्रकारच्या बाबींसाठी निविदा मागविण्यात येतात. परंतु अनेकदा काही ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राट देण्यात येत असल्याचे आरोप होत होते. बहुतांश आरोपांमध्ये तथ्य नसले तरी यामुळे विद्यापीठाचे नाव नाहक खराब होत होते. राज्यातील विद्यापीठांनी जास्तीतजास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यपाल तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले होते; शिवाय कंत्राट पद्धत पारदर्शक करण्याची मागणीदेखील समोर येत होती. या बाबी लक्षात घेऊन विद्यापीठात यावर अनेक दिवसांपासून मंथन सुरू होते. अखेर प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी आता नवीन प्रक्रियेनुसार निविदा ऑनलाईन मागविण्यात येणार आहेत. शिवाय