शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

विधान परिषदेत आता नऊ नागपूरकर सदस्य : प्रवीण दटके यांचा शपथविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 22:00 IST

विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देभाजयुमो कार्यकर्ता ते आमदारकीपर्यंतचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. भाजयुमो कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर व आता आमदार असा दटके यांचा प्रवास राहिला आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरीस विधान परिषदेत नागपूर शहरातील सदस्यांची संख्या आठइतकी होती. नागो गाणार, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, अनिल सोले, गिरीश व्यास, परिणय फुके, रामदास आंबटकर, दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूरकर विधान परिषदेत सदस्य आहेत. आता दटके यांचादेखील यात समावेश झाला आहे. फुके, आंबटकर, चतुर्वेदी हे नागपुरातून विजयी झाले नसले तरी त्यांचे निवासस्थान शहरातच आहे. सद्यस्थितीत विधान परिषदेत ७४ सदस्य असून त्यातील नऊ सदस्य उपराजधानीतील झाले आहेत.भाजपचे नेते प्रभाकरराव दटके यांचे पुत्र असलेल्या प्रवीण यांनी लहानपणापासूनच राजकीय वातावरण जवळून पाहिले. २००० साली दटके यांनी भाजयुमो कार्यकर्ता म्हणून सक्रियपणे काम करायला सुरुवात केली. २००२ साली झालेल्या मनपा निवडणुकांत महाल येथील वॉर्डातून त्यांनी निवडणूक जिंकली. पुढील दोन निवडणुकांतदेखील विजय मिळवून त्यांनी ‘हॅट्ट्रिक’ लगावली. महापालिकेत सत्तापक्ष नेता, जलप्रदाय समिती अध्यक्ष, महापालिकेचे महापौर अशी अनेक पदे दटके यांनी भूषविली. २०१४ साली वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांच्याकडे महापौरपदाची जबाबदारी आली. दरम्यानच्या काळात पक्षातीलदेखील संघटनकार्यात त्यांच्याकडे पदभार येत गेले. २०१० साली ते भाजयुमोचे नागपूर शहर अध्यक्ष झाले. प्रदेश पातळीवर सरचिटणीस म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. २०१७ साली भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकांनंतर त्यांच्याकडे भाजपचे हंगामी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी आली.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMLAआमदार