आता ‘फास्ट फूड’वर नजर

By Admin | Updated: June 16, 2015 02:42 IST2015-06-16T02:42:30+5:302015-06-16T02:42:30+5:30

‘मॅगी’मध्ये घातक रासायनिक घटक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संवेदनशील असलेल्या ‘फास्ट अ‍ॅण्ड

Now look at 'fast food' | आता ‘फास्ट फूड’वर नजर

आता ‘फास्ट फूड’वर नजर

केंद्राने राज्याकडे सोपविली २५ उत्पादनांची यादी
नागपूर : ‘मॅगी’मध्ये घातक रासायनिक घटक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संवेदनशील असलेल्या ‘फास्ट अ‍ॅण्ड जंक फूड’ उत्पादनाची एक यादी तयार केली आहे, ज्यात आरोग्यासाठी घातक असलेले तत्त्व आढळून येऊ शकते. अशा २० ते २५ उत्पादनांची एक यादी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपविली आहे. या खाद्यपदार्थांची तपासणी सुरू करण्यात आली असून प्रयोगशाळांचा अहवाल आल्यानंतरच या खाद्यपदार्र्थांची नावे जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

रेशन दुकानांशी संबंधित तक्रारींवर सुनावणी करण्यासाठी ते सोमवारी नागपुरात आले यावेळी पत्रकारांशी बोलत होते. बापट यांनी सांगितले की, पुणे येथील अन्न व औषधी प्रशासन विभागातर्फे संबंधित उत्पादनांचे काही नमुने तपासले जात आहेत. ही प्रक्रिया खूप लांबलचक असते. त्यामुळे यात काही वेळ लागू शकतो. या तपासणीमध्ये उपरोक्त यादीतील खाद्यपदार्थ दूषित आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध निश्चित कारवाई केली जाईल. ‘मॅगी’ प्रकरणात बॅचच्या आधारावर नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली. राज्यभरातून मॅगीचे नमुने एकत्र करून त्यांची तपासणी पुण्यातील प्रयोगशाळेत करण्यात आली. प्रक्रिया लंबलचक असल्यामुळे अहवाल यायला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने ज्या कंपन्यांची यादी राज्य सरकारकडे सोपविली ती उत्पादने आणि त्यांच्या कंपन्यांची नावे कोणती? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. परंतु बापट यांनी कंपन्यांची नावे जाहीर केली नाही. केवळ ती उत्पादने फास्ट फूडशी संबंधित असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: Now look at 'fast food'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.