शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

आता कमी 'बजेट'मध्येच सोन्याचे दागिने खरेदी करणे अधिक सोपे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 20:17 IST

९ कॅरेट दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य : सराफा बाजारात नवचैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता कमी बजेटमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. सरकारने ९ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग जुलैपासून अनिवार्य केले असून, यामुळे हलक्या वजनाचे, अधिक परवडणारे आणि खात्रीशीर दागिने ग्राहकांसाठी सहज उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी १४ कॅरेटपासून पुढेच हॉलमार्किंग लागू होते. मात्र, आता त्यात ९ कॅरेटचा समावेश झाल्याने कमी उत्पन्न गटातील ग्राहकांनाही गुणवत्तेची खात्री देणारे दागिने खरेदी करता येणार आहेत.

हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांचा लाभ आता अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.  स्टैंडईसने (बीआयएस) ९ कॅरेट सोन्याचे दागिने विक्रीसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करत जुलै २०२५ मध्ये यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात नवचैतन्य निर्माण झाले असून, व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. सरकारचा हा निर्णय सराफा व्यवसायाला गती देणारा आणि ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणारा ठरणार आहे, असे मत सराफांनी व्यक्त केले. विशेषतः कमी उत्पन्न गटातील ग्राहक, ग्रामीण भागातील खरेदीदार आणि युवावर्ग हॉलमार्क असलेले हलक्या वजनाचे व आकर्षक डिझाइनचे दागिने सहजपणे खरेदी करू शकतील. सोन्याच्या किमतीत झपाट्याने झालेल्या वाढीमुळे ग्राहकांचा कल आता ९ कॅरेट सोन्याच्या आकर्षक डिझाइन्सकडे वळणार आहे. स्वस्तात आणि स्टायलिश दागिन्यांच्या शोधात ग्राहक हलक्या कॅरेटच्या पयार्याकडे झुकू लागतील. हॉलमार्किंग प्रणाली प्रभावी करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने देशभरात केंद्रनिहाय विस्तार केला आहे. देशात सुमारे ३६१ जिल्ह्यांत हॉलमार्किंग केंद्र आहेत. पाच वर्षांत २५६ जिल्ह्यात जून-२०२१ मध्ये, दुसरा ३२ जिल्ह्यांत एप्रिल-२०२२ मध्ये, तिसरा ५५ जिल्ह्यांत सप्टेंबर २०२३ आणि चौथा टप्पा १८ जिल्ह्यांत नोव्हेंबर-२०२४ मध्ये लागू केला.

जून-२०२५ मध्ये विक्रीत मोठी घटकोविड-१९ नंतर प्रथमच, जून २०२५ मध्ये देशभरात सोन्याच्या विक्रीत तब्बल ६० टक्के घट झाली असून, ही एक ऐतिहासिक घसरण ठरली आहे. ही घट मागील अनेक वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ२२ जुलै २०२५ रोजी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत ३ टक्के 'जीएसटी'सह १,०३,३०० प्रतितोळा इतकी झाली. यावर १३ ते १६ टक्के मेकिंग चार्जेस घेतले जात असल्यामुळे, ग्राहकांना २४ कॅरेट सोन्याचा दागिना सुमारे १.२० लाखांपर्यंत मिळेल. याउलट, ९ कॅरेट सोन्याचा दागिना 'जीएसटी'सह ३९ ते ४० हजार या दरात उपलब्ध आहे.

टॅग्स :nagpurनागपूरGoldसोनं