शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता मतमोजणी केंद्रात ‘आंब्याची मोजणी’ !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 8, 2024 00:01 IST

- रस्त्यावर टाकलेली ताडपत्री वादळी पावसाने फाटली : फळविक्रेत्यांनी सभागृहात तळ ठोकला

नागपूर : कळमना बाजार समितीच्या आवारातील फळ बाजारपेठेत तयार झालेल्या मतमोजणी केंद्राच्या हॉलमध्ये फळ विक्रेते, शेतकरी आणि कमिशन एजंटांनी तळ ठोकला आहे. या सभागृहात मतमोजणीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समध्ये आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी निवडणूक झाली. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नागपूर येथील कळमना मार्केट यार्डातील लिलाव हॉल क्रमांक-३ मध्ये नागपूर मतदारसंघ आणि क्रमांक-४ मध्ये रामटेक मतदार संघाची मतमोजणी तर लिलाव हॉल क्रमांक-५ मध्ये भोजन आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिनांक १ व २ मे रोजी व्यापाऱ्यांना नोटीसा देऊन ५ मेपर्यंत जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. सात दिवसांपूर्वी सभागृह क्रमांक-४ मध्ये मतमोजणीसाठी बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू झाले. दुसरीकडे विविध फळांच्या लिलावाची व्यवस्था करण्यासाठी फळ बाजारात रस्त्यावरच ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने ताडपत्री फाटली. त्यानंतर फळ व्यापाऱ्यांनी हॉल क्रमांक-४ मध्ये तळ ठोकून आंबा आदी फळे तेथेच ठेवली. अडतिया पांडे म्हणाले, शेतकऱ्यांनी आंबा बाजारात ठेवला होता. पावसामुळे खराब होण्याच्या भीतीने शेतकरी व व्यापाऱ्यांना सभागृहाकडे जावे लागले.

२० मेपर्यंत सवलतजिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मतमोजणी जागेची पाहणी केली आणि मागणीनुसार व्यापाऱ्यांना २० मेपर्यंत व्यवसायाची मुदत दिली. फ्रूट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पर्यायी जागेची मागणी केली होती. मात्र व्यापाऱ्यांऱ्ना रस्त्यावरच ताडपत्री टाकून फळ विक्रीची व्यवस्था करून देण्यात आली. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या फळांचे नुकसान होत आहे. मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २० मेपर्यंत मुदत दिली.

दररोज एक कोटींचे नुकसान !असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, लिलावाच्या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे बाजारात विक्रीसाठी माल आणणाऱ्या १०० हून अधिक शेतकऱ्यांना दररोज एक कोटीचा फटका बसत आहे. फळांचा योग्य लिलाव होत नाही आणि किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी येत नाहीत. निवडणुकीची मतमोजणी अन्यत्र करण्याची बाजार समितीतील विविध असोसिएशनची गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी आहे. मात्र, मागणीकडे नेहमीच कानाडोळा करण्यात येतो.

 

टॅग्स :nagpurनागपूर