शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:32 IST

आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

ठळक मुद्देनियम आणि दिशानिर्देश पाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने नागरिकांनी आपण मनात आणले तर काहीही करू शकतात. हे दाखवून दिले आहे. याच पद्धतीची जीवनशैली भविष्यात प्रत्येकाने अमलात आणावी. आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात पुन्हा लॉकडाऊन करावे की नाही यावर मत-मतांतरे सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवस जनता कर्फ्यूची संकल्पना समोर आली. नागपूरकरांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र या दोन दिवसानंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करु नये. जे नियम कोविड-१९ चे संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने आखून देण्यात आले आहेत, त्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन व्हावे. चेहऱ्यावर मास्क, दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. फिजिकल अंतराचे पालन व्हावे, याची काळजी दुकानदारांनी घ्यायला हवी. प्रत्येक दुकानात सॅनिटायझरची व्यवस्था असायलाच हवी. सम-विषम नियमाचे पालन, सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने उघडी असायला हवी.

दुचाकीवर एका व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. चार चाकीमध्ये टू प्लस वन हा नियम पाळायला हवा. विनाकारण घराबाहेर पडू नये. नको तेथे गर्दी करु नये, हे नियम पाळले तर लॉकडाऊनची गरज मुळीच पडणार नाही. नियमांचे पालन करूनच कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे, असेही तुकाराम मुंढे म्हणाले.

दंड वसुली हा हेतू नाहीमास्क न वापरणे, दुकानांसंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणे यासाठी दंड आकारण्यात येतो. या दंडाची रक्कमही वाढविण्यात आली आहे. दंड वसूल करणे हा मनपाचा उद्देश नाही. नियमांचे पालन सक्तीने व्हावे, ही त्यामागील भूमिका आहे. 

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस