आता आधार लिंकसाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत

By Admin | Updated: June 26, 2015 02:46 IST2015-06-26T02:46:59+5:302015-06-26T02:46:59+5:30

‘आधार कार्ड’ निवडणुकीच्या कार्डाशी जोडण्याच्या अभियानाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने ...

Now the help of students will be taken for the support link | आता आधार लिंकसाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत

आता आधार लिंकसाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत

नागपूर : ‘आधार कार्ड’ निवडणुकीच्या कार्डाशी जोडण्याच्या अभियानाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने निवडणूक विभागाने आता यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रायोगिक स्तरावरील सुरुवात २६ जूनपासून होत आहे.
आधार कार्ड निवडणुकीच्या कार्डाशी जोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु या अभियानाला पाहिजे तसा प्रतिसाद लोकांकडून मिळाला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने आता यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ३७० कॉलेज आहेत.
प्रत्येक कॉलेजमध्ये शिबिर घेऊन त्यातून दोन विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात येईल. त्याला प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर ते विद्यार्थी स्वयंसेवक लोकांमध्ये जाऊन आपल्या परिसरातील नागरिकांना आधार कार्ड निवडणूक कार्डशी लिंक करण्याबाबत जागृती करतील, असे एकूण याचे स्वरूप आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील १२ महाविद्यालयातून याची शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.
शहरातील धनवटे नॅशनल कॉलेज, सीपी अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय, पीडब्ल्यूएस कॉलेज, तुली इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट, काटोल येथील नबीरा महाविद्यालय, सावनेर येथील हरिभाऊ आदमने आर्ट अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालय, हिंगणा येथील वायसीसीए, उमरेड येथील नूतन आदर्श अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालय आदी महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात शिबिर आयोजित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना या अभियानाबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर महाविद्यालयात हाच प्रयोग राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the help of students will be taken for the support link