आता राज्य स्तरावर सरकारी वकिलांची संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:56 IST2018-05-28T21:56:20+5:302018-05-28T21:56:29+5:30
जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांची महाराष्ट्र प्रदेश जिल्हा सरकारी वकील संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

आता राज्य स्तरावर सरकारी वकिलांची संघटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांची महाराष्ट्र प्रदेश जिल्हा सरकारी वकील संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे सोमवारी संघटनेची बैठक झाली. दरम्यान, संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महासचिवपदी अजय राख (बिड), उपाध्यक्षपदी शरद जाधवार (उस्मानाबाद), सुशील पंडित (नंदुरबार), प्रदीप राजपुत (सोलापूर), सूर्यकांत खानोरकर (सिंधुदुर्ग), संगीत फड (ठाणे), सहसचिवपदी उल्हास चिपरे (सांगली), अजय मिसर (नाशिक), नीती दवे (यवतमाळ), कोषाध्यक्षपदी अमोल बल्लाळ (बुलडाणा) तर, प्रसिद्धी प्रमुखपदी महेश चांदवानी (गोंदिया) यांची निवड झाली. इतर सर्व जिल्हा सरकारी वकील कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्य करतील.