शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आता नव्या वाहनांचेही फिटनेस; परिवहन विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 10:59 IST

राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मोटार वाहन निरीक्षकांवर पडणार कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदाारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसे योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या संदर्भाचे आदेश परिवहन विभागाने नुकतेच काढले आहे. परंतु याला घेऊन निरीक्षकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.सर्वाधिक महसूल मिळवून देण्यामध्ये अग्रेसर असलेल्या राज्याच्या परिवहन विभागामध्ये एकूण ५,१०० पदांमधून २,२५६ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रतीक्षा परिवहन विभाग करीत आहे. प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कणा असलेल्या मोटार वाहन निरीक्षक व सहायक निरीक्षकांची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मोटार वाहन निरीक्षकांची मंजूर असलेल्या ८६७ पदांपैकी ३७३ पदे रिक्त आहेत, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर १३०२ पदांपैकी १००८ पदे रिक्त आहेत. यातच रोज शेकडो नव्या वाहनांची नोंदणी करणाऱ्या आरटीओ कार्यालयांवर कामाचा ताण पडला आहे. विशेषत: वाहन परवान्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेणे, चाचणी घेणे, परवाना देणे, वाहनांची नोंदणी करणे, योग्यता प्रमाणपत्र देणे, वाहन तपासणी आदी कामांची जबाबदारी निरीक्षकांवर आहे. कामे जास्त आणि अधिकारी कमी, अशा कचाट्यात आरटीओ कार्यालये सापडली आहेत. आता आणखी एकाचा कामाचा भार निरीक्षकांवर देण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार निरीक्षकांना नवीन वाहनांची तपासणी करून त्यांना योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. एकीकडे रोजच्या कामावर कॅमेºयांची नजर, कामात चूक झाल्यास निलंबनाची टांगती तलवार त्यात हे नवे काम समोर आल्याने निरीक्षकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस