शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांना शेतातच करता येईल संत्र्याचे ग्रेडिंग; एम-गिरी संस्थेने विकसित केले मशीन

By निशांत वानखेडे | Updated: October 31, 2023 11:48 IST

८ तासांत ३ टन मालाचे वर्गीकरण

निशांत वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: शेतातील संत्र्याचे वर्गीकरण किंवा ग्रेडिंग करणे, ही शेतकऱ्यांसाठी अडचणीची गाेष्ट असते. ग्रेडिंग केले नसेल तर भाव मिळत नाही आणि ग्रेडिंग करायला न्यायचे म्हटले तर वाहतूक खर्चाचा भुर्दंड बसताे. मात्र यापुढे संत्रा उत्पादकांना हा मन:स्ताप सहन करावा लागणार नाही. वर्ध्याच्या ‘एम-गिरी’ या संस्थेने साैरऊर्जेवर चालणारी मशीन तयार केली आहे, जी प्रत्यक्ष शेतात नेऊन संत्र्याचे आकारानुसार ग्रेडिंग करता येईल.

महात्मा गांधी ग्रामीण उद्याेग संशाेधन संस्था (एम-गिरी) चे संचालक डाॅ. आशुतोष मुरकुटे यांच्या मार्गदर्शनात कृषी अभियंता डाॅ. गणेश थेरे यांच्या टीमने ही मशिन तयार केली आहे. काेराेना महामारीच्या आधी शेतकऱ्यांनी या समस्येबाबत सांगितले हाेते. त्यानुसार संस्थेने संशाेधन सुरू केले हाेते. त्यानुसार एक माेठी मशीन तयार करण्यात आली. यामध्ये ४० मि.मी. ते ९० मि.मी. अशा ६ आकाराच्या संत्र्याचे ग्रेडिंग करणे शक्य झाले. साैरऊर्जेवर चालणाऱ्या या मशीनवर ट्रायल करण्यात आली तेव्हा ८ तासांत अडीच ते ३ टन संत्र्याचे ग्रेडिंग शक्य झाले.

मात्र ही मशीन एका जागेवरून हलविता येत नसल्याने वाहतुकीची अडचण हाेतीच. त्यामुळे संस्थेने पुन्हा लहान आकाराची मशीन तयार केली. ही मशिन एका छाेट्या टेम्पाेवर सहज असेंबल करून एका जागेवरून दुसरीकडे ने-आण करता येते. केवळ ३० हजार रुपयांच्या अल्प खर्चात ही मशीन तयार झाली असून तेवढ्याच किमतीत शेतकऱ्यांना घेता येईल, अशी माहिती डाॅ. थेरे यांनी दिली.

का गरजेची आहे ग्रेडिंग?

  ग्रेडिंग केले नसेल तर लहान संत्रे पाहून ग्राहक नापसंती दर्शवितात. व्यापारीही भाव कमी करून मागतात.   ग्रेडिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना संत्रा ग्रेडिंग सेंटरवर न्यावा लागताे. त्यासाठी वाहतुकीचा खर्च वाढताे.   ग्रेडिंग सेंटरवरून पुन्हा मार्केटमध्ये नेण्याचा खर्चही लागताे.   लहान आकाराचा संत्रा पुन्हा परत आणावा लागताे. 

या मशीनचे फायदे

 शेतातच ग्रेडिंग करता येईल.  माेठ्या आकाराचे व लहान आकाराच्या संत्र्यांना प्रक्रिया उद्याेगांना देता येईल.   संत्रे ज्यूस व्यापाऱ्यांना पुरवता येईल.   शहरी ग्राहकांना माेठा संत्रा आवडताे. सारख्या आकाराचा संत्र्याला भाव चांगला मिळताे.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलnagpurनागपूर