नागपूर रेल्वे स्थानकावर आता ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 21:02 IST2023-06-17T21:02:10+5:302023-06-17T21:02:42+5:30

Nagpur News मुख्य रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला आता प्रवाशांच्या सोयीसाठी ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांची रेल्वे स्थानकाच्या दारावर गर्दी होऊ नये आणि त्यांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये म्हणून ही सोय करण्यात आली आहे.

Now 'Drop and Go' facility at Nagpur railway station | नागपूर रेल्वे स्थानकावर आता ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा

नागपूर रेल्वे स्थानकावर आता ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा

नागपूर : मुख्य रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला आता प्रवाशांच्या सोयीसाठी ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांची रेल्वे स्थानकाच्या दारावर गर्दी होऊ नये आणि त्यांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये म्हणून ही सोय करण्यात आली आहे.

स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या हेरिटेज बिल्डिंगच्या समोर लेन नंबर दोन विशेषत्वाने कारसाठी ‘ड्रॉप अँड गो’ची सेवा राहणार आहे. तर लेन नंबर तीनमध्ये ऑटो, टॅक्सी आणि कारसाठीही ही सुविधा आहे. वाहनचालक किंवा प्रवाशांना सोयीचे व्हावे म्हणून तसे स्पष्ट सूचना संकेत लावण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, प्रवाशांना सोडण्यासाठीच ही व्यवस्था आहे. प्रवाशांना घेण्यासाठी (पिकअप) तेथे परवानगी नाही. नागपूरच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी पश्चिम दिशेला प्री पेड ऑटो बुथची व्यवस्था आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

----

Web Title: Now 'Drop and Go' facility at Nagpur railway station