आता बोर्इंग नव्हे एअर इंडियाचा एमआरओ

By Admin | Updated: June 7, 2015 03:05 IST2015-06-07T03:05:47+5:302015-06-07T03:05:47+5:30

बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालन करण्यास नकार दिला.

Now Broing is not an Air India MRO | आता बोर्इंग नव्हे एअर इंडियाचा एमआरओ

आता बोर्इंग नव्हे एअर इंडियाचा एमआरओ

नागपूर : बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालन करण्यास नकार दिला. त्यामुळे आता या प्रकल्पाचे संचालन एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
मिहानमधील एअर इंडियाच्या देखभाल व दुरुस्ती केंद्राची (एमआरओ) पाहणी केल्यानंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात पीएमओ कार्यालयाशी संपर्क साधल्याचे गडकरी म्हणाले.
मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.आर. जगन्नाथ, नागपूर एमआरओचे महाव्यवस्थापक व्ही.जी. पाटील, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रकाश गजभिये, आ. मिलिंद माने उपस्थित होते.
६५० कोटींचा एमआरओ
करारानुसार बोर्इंगने ६५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एमआरओची उभारणी केली. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जानुसार बांधकाम केले आहे. एमआरओचे मुख्यद्वार २२ कोटींचे असून जर्मनी येथील अभियंत्यांनी एक महिन्यात उभारले आहे. एमआरओला १० मे २०१५ रोजी डीजीसीएची परवानगी मिळाली असून प्रारंभी बोर्इंनच्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. दोन हँगरमध्ये बोर्इंगच्या बी-७७७ आणि बी-७८७ यासारख्या मोठ्या विमानांची दुरुस्ती करण्यात येईल. युरोपमधील एअर बस कंपनीच्या विमानांच्या दुरुस्तीसाठी डीजीसीएकडे परवानगी मागितली आहे. परवानगीनंतर एअर बस कंपनीची ए-३२० आणि ए-३८० यासारख्या सहा छोट्या विमानांची दुरुस्ती एमआरओमध्ये एकाचवेळी करता येईल. दक्षिण-पूर्व आशियातील बोर्इंगच्या विमानांसाठी हा एमआरओ सक्षम असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Now Broing is not an Air India MRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.