रामझुल्यात आता कंत्राटदाराचा अडथळा

By Admin | Updated: August 1, 2015 04:03 IST2015-08-01T04:03:25+5:302015-08-01T04:03:25+5:30

रामझुला रेल्वे उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी शुक्रवारी जुना पूल तोडण्यात येणार आहे.

Now the barrier of contractor in Ramjulla | रामझुल्यात आता कंत्राटदाराचा अडथळा

रामझुल्यात आता कंत्राटदाराचा अडथळा

शुक्रवारी तोडायचा होता जुना पूल : अधिकारी वाट पाहत राहिले
नागपूर : रामझुला रेल्वे उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी शुक्रवारी जुना पूल तोडण्यात येणार आहे. रेल्वेची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूल तोडण्याचा प्लान तयार करण्याचे निर्देश कंत्राटदार एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांना दिल होते. एफ्कॉन्सतर्फे शुकवारी पूल तोडला जाणार होता. एमएसआरडीसीचे अधिकारी त्यासाठी दिवसभर वाट पाहत राहिले. मात्र, कंत्राटदार एफ्कॉन्सने पूल तोडण्यासाठी के्रेनची व्यवस्थाच केली नाही. यामुळे काम रखडले.
कंत्राटदार एफ्कॉन्सने केलेल्या या प्रकारामुळे एमएसआरडीसी संतापली आहे. एमएसआरडीसी आता एफ्कॉन्सला पत्र पाठवून के्रेनची व्वस्था केव्हापर्यत करणार असल्याची विचारणा करणार आहे. दुसरीकडे, जुन्या पुलावर लोखंडी गर्डर आणून ठेवले आहेत. या गर्डरवर क्रेन चढवली जाईल. यानंतर ‘वायर सॉ’ म्हणजे वायरपासून बनलेल्या आरीने जुना पूल कापला जाईल. तुटलेला पूल क्रेनच्या मदतीने उचलून दुसरीकडे नेला जाईल. या पुलाच्या खालून २४ तास रेल्वे वाहतूक सुरू असते. त्यामुळे पूल तोडण्यासाठी ही पद्धत वापरली जाणार आहे. विजेचे तार व इतर तार बांधून एकीकडे हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. ठरल्याप्रमाने एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ३१ जुलै रोजी पूल तोडण्याचे काम सुरू करेल अशी एमएसआरडीसीला अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रेनची लोड बियरिंग टेस्ट घेणे बाकी आहे. त्यानंतर क्रेन साईटवर आणून पूल तोडण्याचे काम सुरू होईल. एफ्कॉन्सच्या अधिकाऱ्यांनी एमएसआरडीसीला तोंडी कळविले आहे की, ९ आॅगस्ट पासून हे काम सुरू होईल.
यापूर्वीही कोडल चार्जच्या रुपात ११ कोटी रुपये देण्याच्या मुद्यावरून रेल्वेने रामझुला भाग- २ च्या बांधकामात अडथळा आणण्याचे काम केले. आता मात्र, रेल्वेने हिरवी झेंडी दिली असताना कंत्राटदार आडकाठी आणत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the barrier of contractor in Ramjulla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.