अब की बार, रेल्वेची भाडेवाढ
By Admin | Updated: June 23, 2014 01:20 IST2014-06-23T01:20:14+5:302014-06-23T01:20:14+5:30
महागाईच्या नावावर काँग्रेस सरकारच्या विरोधात बोटे मोडणाऱ्या भाजपचा सत्ता येताच खरा चेहरा पुढे आला आहे. आता फक्त रेल्वेची दरवाढ झाली आहे. पुढील पाच वर्षात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढणार

अब की बार, रेल्वेची भाडेवाढ
शहर काँग्रेसतर्फे निषेध : मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
नागपूर : महागाईच्या नावावर काँग्रेस सरकारच्या विरोधात बोटे मोडणाऱ्या भाजपचा सत्ता येताच खरा चेहरा पुढे आला आहे. आता फक्त रेल्वेची दरवाढ झाली आहे. पुढील पाच वर्षात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढणार असून, महागाईमुळे जनता होरपळून निघणार आहे. भाजपने निवडणुकी पूर्वी जनतेला ‘अच्छे दिन अने वाले है’चे स्वप्न दाखविले. अता मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे, असा करीत शहर काँग्रेसने व्हेरायटी चौकात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. रेल्वे भाडेवाढीमुळे प्रवास तर महागणार आहेच पण मालवाहतूकही महागणार आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तुंच्या किंमती वाढतील. याचा फटका सर्वसामान्यांना बसेल, असे सांगत हेच का मोदी सरकार, असा सवाल ठाकरे यांनी केला. माजी मंत्री अनीस अहमद, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, योगेश तिवारी, विजय बारसे, शहर उपाध्यक्ष राजू व्यास, कमलेश समर्थ, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, युथ काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, उमाकांत अग्निहोत्री, गजराज हटेवार, यादवराव देवगडे, कांता पराते, संदेश सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते अंदोलनात सहभागी झाले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारच्या कामकाजाची पोलखोल केली. सरकारकडून रेल्वे दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यापुढे कुठलीही दरवाढ सहन केली जाणार नाही. सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. कार्यकर्त्यांनी मोदी सरकार व रेल्वेमंत्र्याच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी निषेध फलक घेऊन रस्तारोको केला. नागरिकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)