आता प्रवेशाची ‘परीक्षा’

By Admin | Updated: June 8, 2015 02:44 IST2015-06-08T02:44:37+5:302015-06-08T02:44:37+5:30

निकालांचे दिवस म्हटले की लागलीच प्रवेशाची तयारीदेखील सुरू होते. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे.

Now admission test | आता प्रवेशाची ‘परीक्षा’

आता प्रवेशाची ‘परीक्षा’

नागपूर : निकालांचे दिवस म्हटले की लागलीच प्रवेशाची तयारीदेखील सुरू होते. सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर आता अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रियादेखील सुरू झालेली आहे. यासोबतच ‘आयटीआय’सारख्या (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) विविध अभ्यासक्रमांच्या अर्जांचे वाटपदेखील सुरू झाले आहे. अशा स्थितीत प्रवेशप्रक्रियेचे नेमके वेळापत्रक माहीत असणे अतिशय आवश्यक असते. नजरचुकीमुळे अनेकदा अर्ज दाखल करण्याची मुदत निघून जाते. शिवाय प्रवेशासाठी साधारणत: आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच तयार करुन ठेवली तर ऐनवेळी धांदल उडत नाही. त्याची तयारी करणेदेखील आवश्यक झाले आहे.

Web Title: Now admission test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.