१ नोव्हेंबरपासून राष्ट्रीयकृत बँकांची वेळ सकाळी ११ ते ५ पर्यंत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:00 AM2019-10-31T11:00:12+5:302019-10-31T11:01:36+5:30

ग्राहकांच्या सुविधेसाठी राष्ट्रीययकृत बँका आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत.

From November1, the time of nationalized banks will be from 11 to 5 | १ नोव्हेंबरपासून राष्ट्रीयकृत बँकांची वेळ सकाळी ११ ते ५ पर्यंत होणार

१ नोव्हेंबरपासून राष्ट्रीयकृत बँकांची वेळ सकाळी ११ ते ५ पर्यंत होणार

Next
ठळक मुद्देग्राहकांची होणार सुविधा व्यावसायिकांना फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकांच्या सुविधेसाठी राष्ट्रीययकृत बँका आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत.
भारतीय बँकिंग संघटनेने सार्वजनिक बँकांच्या सेवेच्या कामकाजाच्या वेळेत बदल करून अनोखे पाऊल उचलले आहे. इंडियन बँक्स असोसिएशनच्या आदेशावर जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीने नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या कामकाजाची वेळ निश्चित करण्याची सूचना केली होती. या आधारावर उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे स्टेट चेअरमन आणि ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सचिव अनिल खपरिये यांनी लोकमतशी बोलताना दिली.
१ नोव्हेंबर २०१९ पासून सर्व राष्ट्रीयकृत बँक शाखांच्या वेळेत बदल होणार आहे. यापूर्वी ग्राहकांना सकाळी १०.३० ते दुपारी ४ पर्यंत बँकांच्या सुविधांचा लाभ मिळत होता. पण आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत बँकिंग सेवेचा फायदा घेता येईल. त्यांनी सांगितले की, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र तसेच अन्य कार्यालयांसाठी बँकेत आर्थिक व्यवहारासाठी वेगवेगळे वेळापत्रक बनविले आहे. नवीन वेळापत्रकानुसार निवासी भागातील नागरिकांसाठी सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत, मार्केट क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आणि अन्य शाखा व कार्यालयांसाठी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत वेळ निर्धारित करण्यात आली आहे.

बँकांचे नवीन वेळापत्रक
व्यावसायिक शाखा : सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत. (बाजारपेठ भागातील शाखा)
निवासी शाखा : सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत.
(निवासी भागातील शाखा)
अन्य शाखा : सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत.
(बँक कार्यालय व अन्य शाखा)

Web Title: From November1, the time of nationalized banks will be from 11 to 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक