शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

कुख्यात सफेलकरची पोलिसांनी काढली वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 9:43 PM

Notorious Safelkar arrested, Crime news नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकरला मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी त्याला जिल्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले. यावेळी आकाशवाणी चौकातून न्यायालयापर्यंत पायी नेत पोलिसांनी त्याची वरात काढली.

ठळक मुद्दे७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी : आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकरला मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी त्याला जिल्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले. यावेळी आकाशवाणी चौकातून न्यायालयापर्यंत पायी नेत पोलिसांनी त्याची वरात काढली. दरम्यान, न्यायालयाने त्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

काही दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांनी २०१६ मध्ये झालेल्या एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाचा उलगडा करत एका अज्ञात व्यक्तीने कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकरला तब्बल पाच कोटी रुपयांची सुपारी देऊन एकनाथ निमगडे यांची हत्या घडविली होती, असे समोर आणले होते. त्यानंतर पोलिसांनी फरार असलेल्या सफेलकर टोळीतील शरद ऊर्फ कालू हाटे आणि इतर काही गुंडांना अटक केली होती. मात्र टोळीचा म्होरक्या रणजित सफेलकर फरार होता. त्याला काल रात्री पोलिसांनी अज्ञात ठिकाणावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कुख्यात गँगस्टर रणजित सफेलकर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर नागपुरातील इतर अनेक मोठ्या गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी संतोष आंबेकर प्रमाणे सफेलकरला हाफ पँटमध्ये पायी फिरवले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक सफेलकरला घेऊन आकाशवाणी चौकात पोहोचले. तेथून त्याला सत्र न्यायालय परिसरात पायी आणण्यात आले. सफेलकरला विना चपलेने पाहून लोकांना संतोष आंबेकरची आठवण झाली. असे करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे त्याच्याबद्दलची लोकांमध्ये असलेली दहशत दूर करणे होते.

एन्काउण्टरच्या भीतीने सरेंडर केल्याची चर्चा

सफेलकरला पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले जात असले तरी एन्काउण्टरच्या भीतीने सफेलकर हा स्वत:च सरेंडर झाल्याची गुन्हेगारी जगतात चर्चा आहे. आठवडाभरापूर्वी भंडारा येथे सफेलकर व पोलिसांचा सामना झाला होता. पोलीस त्याला पकडतील त्यापूर्वीच तो जंगलात पळून गेला. पुढे ट्रकने तो शेजारी राज्य मध्य प्रदेशात निघून गेला. भंडाऱ्यातील प्रकरणामुळे पोलीस त्याचा एन्काउण्टर करण्याच्या तयारीत असल्याची सफेलकरला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने यासंदर्भात न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. बुधवारी ही याचिका मागेसुद्धा घेतली. सूत्रानुसार आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सफेलकर निमगडे हत्याकाडांबाबत माहीत नसल्याचे सांगत आहे. मनीष श्रीवाससंदर्भात मात्र तो काही बोलत असल्याचे सांगितले जाते.

हाटे बंधूंची पोलीस कोठडी ६ पर्यंत वाढविली

गुन्हे शाखेने बुधवारी सफेलकर, काललू हाटे व त्याचा भाऊ भरत याला न्यायालयासमोर सादर केले. पोलिसांनी मनीष श्रीवासच्या मृतदेहाचे अवशेष गोळा करणे, योजनेत सामील इतर आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करीत सफेलकरला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले, तर हाटे बंधूंची पोलीस कोठडीसुद्धा ६ एप्रिलपर्यंत वाढविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर