शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

By योगेश पांडे | Updated: April 9, 2024 22:19 IST

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या घरीदेखील केली होती चोरी

नागपूर: देशातील विविध राज्यांत तब्बल २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. रामदासपेठेतील एका व्यावसायिकाच्या घरी चोरी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्यासह आतापर्यंत २२ गुन्हे दाखल असलेल्या साथीदारालादेखील अटक केली आहे. कुख्यात घरफोडयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनकडेदेखील घरफोडी केली होती.

मोहम्मद सलीम मोहम्मद हबीब कुरेशी (५१, रंगारेड्डी, हैदराबाद) व शाबीर उर्फ साबीर जमील कुरेशी (३२, रफीकनगर, गोवंडी, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषभ राजेंद्र कामदार (४३, रामदासपेठ) यांचे आईवडील १७ मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. कामदार नियमितपणे आईवडिलांकडे जाऊन पाहणी करत होते. २५ मार्च रोजी रात्री तेथे घरफोडी झाली व आरोपींनी १७.९० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. कामदार यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाकडून याचा समांतर तपास सुरू होता.

सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना यात कुरेशी व शाबीर सहभागी असल्याची माहिती मिळाली. दोघेही ज्या लॉजमध्ये थांबले होते तेथून त्यांचा पत्ता मिळाला. पोलिसांच्या पथकाने हैदराबादला जाऊन अगोदर कुरेशी व नंतर शाबीरला अटक केली. दोघांनीही गुन्हा कबूल केला. त्यांच्या ताब्यातून कार, मोबाईल असा ९.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपींना सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरण कबाडी, मयुर चैरसिया, राजेश देशमुख, रवि अहीर, प्रशांत गभने, श्रीकांत उईके, निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार व प्रविण रोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शाबीरवर मुंबईत २२ गुन्हे५१ वर्षीय कुरेशीवर देशभरात चोरीचे २१३ गुन्हे दाखल आहेत तर शाबीरवर मुंबईत २२ गुन्हे दाखल आहेत. २००१ मध्ये कुरेशनीने तीन साथीदारांच्या मदतीने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या घरातून चोरी केली होती. या चोरीने मुंबई पोलीसही चक्रावून गेले. कुरेशी त्यानंतरच हैदराबादला पळून गेला.

महागड्या कारमध्ये फिरायचे आरोपीकुरेशी महागड्या कारमध्ये फिरून चोरी करतो. मोठ्या शहरांमध्ये जाऊन पॉश अपार्टमेंट शोधल्यावर तेथील पार्किंगमध्ये कार पार्क करून बंद फ्लॅट शोधायचे. दारासमोर वर्तमानपत्र किंवा दुधाची पिशवी पाहून फ्लॅट मालक बाहेर गेल्याची माहिती ते काढायचे. स्क्रू ड्रायव्हर आणि टॉमीच्या साहाय्याने ते कुलूप किंवा कुंडी सहज फोडायचे. दोघेही आरोपी भाड्याच्या कारने नागपुरात आले व चोरी करून मुंबईला गेले. त्यांनी तेथील एका सराफा व्यापाऱ्याला दागिने विकले. कुरेशीला चैनीचे आयुष्य जगण्याची सवय आहे. तो विमानाने प्रवस करतो व पॉश हॉटेलमध्ये मुक्काम असतो. त्याला पाच मुले असून तो पोलिसांना चकमा देण्यासाठी कुटुंबापासून दूर राहतो.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर