शहरं
Join us  
Trending Stories
1
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
2
"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
3
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
4
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
5
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
6
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
7
BBM6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
8
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
9
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
10
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
11
अमरावतीतील गावात सायंकाळी भोंगा वाजला की बंद होतात मोबाइल, टीव्ही; राज्यभर 'या' गावाची का आहे चर्चा ?
12
'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
13
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
14
आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
15
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
16
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
17
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
18
'विराट' दूरावा संपला! ज्या गोष्टीपासून लांब राहिला, तिकडे पुन्हा वळला किंग कोहली; ‘यू टर्न’ चर्चेत
19
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
20
ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील इंदोऱ्यात कुख्यात गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:06 IST

जुगाराच्या पैशावरून झालेल्या वादात एका कुख्यात गुंडाची गळा कापून हत्या करण्यात आली. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील मायानगर इंदोरा येथे घडली. या घटनेमुळे इंदोरा परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजुगाराच्या पैशावरून वाद, साथीदारानेच केला खून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुगाराच्या पैशावरून झालेल्या वादात एका कुख्यात गुंडाची गळा कापून हत्या करण्यात आली. ही घटना जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील मायानगर इंदोरा येथे घडली. या घटनेमुळे इंदोरा परिसरात खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रानुसार अवैध धंद्यात सहभागी असलेल्या साथीदारांनीच त्याची हत्या केली. संदीप ऊर्फ काल्या विकास गजभिये (२५) रा. मायानगर इंदोरा, असे मृताचे नाव आहे. काल्याविरुद्ध मारहाण, धमकी देणे, जुगार व मटका चालविण्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊही गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मायानगर परिसरात ललित कला भवन या केंद्राच्या परिसरात त्याने जुगार व मटका अड्डा सुरू केला आहे. या जागेवर तो दिवस-रात्र बसून राहत होता. मागील काही दिवसांपासून त्याच्या साथीदारासोबत पैशावरून त्याचा वाद सुरू होता. चार दिवसापूर्वीच काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला. यानंतर बुधवारी ३.३० वाजता दरम्यान काल्या आपल्या जुगार अड्ड्यावर आला. त्याचवेळी त्याचा साथीदारासोबत जुन्या पैशावरून वाद झाला. या वादात चौघांनी मिळून काल्याला मारहाण केली. तो पळू लगला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून मैदानातच धारदार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. यानंतर आरोपी फरार झाले.दुपारी ४.३० वाजता पोलीस कंट्रोल रुमला त्याच्या खुनाची माहिती मिळाली. यानंतर जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविला. या प्रकरणात पोलिसांनी मायानगर येथील शंभू घुबड आणि लंकेश याला ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून