नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST2021-05-15T04:07:08+5:302021-05-15T04:07:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुन्या वैमनस्यातून गुंडांच्या एका टोळीने कुख्यात गुंड शानू उर्फ शहानवाज याची निर्घृण ...

Notorious goon killed in Nagpur | नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या

नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जुन्या वैमनस्यातून गुंडांच्या एका टोळीने कुख्यात गुंड शानू उर्फ शहानवाज याची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी १०.१५च्या सुमारास गांधी गेट महाल भागात ही थरारक घटना घडली.

शानू हा कुख्यात गुंड होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएसह विविध प्रकारची कारवाईदेखील केली होती. तीन वर्षांपूर्वी त्याने कुख्यात प्रवीण घाटेवर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून घाटे टोळीसोबत त्याचे वैमनस्य आले होते. शानूचा गेम करण्यासाठी ते संधी शोधत होते. या पार्श्वभूमीवर शानू शुक्रवारी सकाळी दुचाकीने जात असताना त्याच्या मागावर असलेले सौरभ घाटे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी त्याला गांधी गेटजवळ गाठले आणि शस्त्राचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली.

ही माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला.

Web Title: Notorious goon killed in Nagpur