शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या घरची झाडाझडती,सापडले तीन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:15 IST

एक कोटीची खंडणी मागणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या इतवारीतील घरझडतीत पोलिसांना केवळ तीन लाख रुपये मिळाले.

ठळक मुद्देभाच्यालाही केली पोलिसांनी अटक : १८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुजरातमधील एका उद्योजकाला जमिनीच्या व्यवहारात फसवून त्यांच्याकडून पाच कोटी रुपये हडपल्यानंतर त्यांना पुन्हा एक कोटीची खंडणी मागणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या इतवारीतील घरझडतीत पोलिसांना केवळ तीन लाख रुपये मिळाले. दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेला संतोषचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करून, त्याचाही १८ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.गुजरातमधील उद्योजक जिगर पटेल यांना मुंबईत आऊटलेट सुरू करायचे होते. एका दलालाच्या माध्यमातून आंबेकरसोबत त्यांची ओळख झाल्यानंतर, मुंबईच्या मालाड परिसरात आंबेकरने पटेल यांना एक जागा दाखविली. ही आपलीच आहे, असे सांगत बनावट कागदपत्रेही दाखविली. त्या जागेचा १० कोटीत सौदा करून टोकन म्हणून आंबेकरने पाच कोटी रुपये घेतले. रक्कम घेतल्यानंतर १५ महिने होऊनही आंबेकर त्या जागेची विक्री करून द्यायला तयार नसल्यामुळे पटेल यांनी चौकशी केली असता, ती जागा दुसऱ्याच्या मालकीची असल्याचे आणि आंबेकरने साथीदारांच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे पटेल यांच्या लक्षात आले. त्यामुळे पटेल यांनी त्यांना आपले पाच कोटी परत मागितले. आंबेकरने त्यांना नागपुरात बोलवून सेंटर पॉईंटमध्ये मीटिंग केली. यावेळी आंबेकरने पटेल यांना पिस्तूल दाखवून ‘ते पाच कोटी आणि जागा विसरून जा. पुन्हा एक कोटी रुपये खंडणी दे, नाही तर जीवे ठार मारेन’, अशी धमकी दिल्याचे समजते. १२ ऑक्टोबरला पटेल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवली. त्यानुसार, सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेकरच्या मुसक्या बांधल्या. तो सध्या पोलीस कस्टडीत आहे. त्याच्याकडून तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संतोषचा भाचा नीलेश केदार याला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. तत्पूर्वी संतोषच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या घरात केवळ तीन लाख रुपये आढळले.अंकलेश्वरहून मुंबईत पोहचली रोकडजून २०१८ मध्ये पटेल यांना संतोषने पाच कोटी रुपये हवालाने मागवून घेतले होते. त्यानुसार, गुजरातच्या अंकलेश्वरमधून ही रोकड मुंबईत आली आणि संतोषने साथीदारांच्या माध्यमातून ती ताब्यात घेतली. ही रोकड त्याने कुठे दडवून ठेवली किंवा त्यातून काय खरेदी केले, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.मुंबईतही दोघांना अटकया गुन्ह्यात संतोषसोबत आणखी पाच ते सात आरोपी आहेत. त्यांची नावे संतोषने पोलिसांना सांगितली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे एक पथक दोन दिवसांपूर्वीच मुंबईत पोहचले. या पथकाने संतोषच्या दोन साथीदारांना मंगळवारी मुंबईत ताब्यात घेतले. त्यांना घेऊन पोलीस नागपूरकडे निघाले. बुधवारी पहाटेपर्यंत हे पथक नागपुरात पोहचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर