शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

साक्षरता कार्यक्रमाचे सर्वेक्षण ठप्प; उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व गटसमन्वयांना नोटीस

By गणेश हुड | Updated: November 8, 2023 14:31 IST

जि.प.प्रशासन अॅक्शन मोडवर : नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सर्वेक्षण

नागपूर : शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन सिमिती, शाळा व्यवस्थापन समिती व विकास समिती यांच्यावर नवभारत साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात साक्षरता कार्यक्रमाचे सर्वेक्षण ठप्प असल्याने जिल्हा परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी यासंदर्भात उपशिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी व गटसमन्वयांना नोटीस बजावून यासदर्भात सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहे. 

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण, स्वयंसेवकांचे सर्वेक्षण, अध्ययन-अध्यापन व इतर कामकाजासाठी महाविद्यालयीन  व शालेय विद्यार्थी, स्काऊट गाईड, शिक्षक, बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण विभागाने नवभारत साक्षरता कार्यक्रमाची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही. याची दखल घेत सीईओ यांनी उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व गटसमन्वयांना कारणे द्या नोटीस बजावून सात दिवसात खुलासा शिक्षणाधिकारी (योजना ) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीतही बहिस्कारावर तोडगा नाही

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर सर्वेक्षण , त्या सबंधातील प्रशिक्षणं व इतर कामावर शिक्षक संघटनांनी यापुर्वीच बहिष्कार घोषीत केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण उपसंचालकांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची पुणे येथे बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. शिक्षक संघटनांना बहिस्कार मागे घेण्यास नकार दिला आहे. 

शैक्षणिक कामास संघटनांचा नकार 

राष्ट्रीय दशवार्षिक जनगणना , निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन याव्यतिरीक्त कोणतीहे अशैक्षणिक कामे शिक्षकांना  देता येणार नाही अशी स्पष्ट तरतुद असताना या कामाची शिक्षकांना सक्ती करणे ही बाब या कायद्यातील तरतुदींचे  उल्लंघन करणारी आहे , त्यामुळे निरक्षर सर्वेक्षणाची सक्ती करण्यात येवू नये अशी भुमिका शिक्षक संघटनेचे नेते लिलाधर ठाकरे, तसेच मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नेते प्रवीण मेश्राम यांनी घेतली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर