शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

कर भरणाऱ्यांनाही नोटीस

By admin | Updated: July 3, 2014 00:50 IST

नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास

मनपाचा विचित्र कारभार : हजारो रुपयांच्या कर आकारणीमुळे नागरिक त्रस्त नागपूर : नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाही मनपाच्या कर आकारणी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या कर विभागातर्फे नागरिकांना कर आकारणीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. परंतु यात मोठा गोंधळ करण्यात करण्यात आला आहे. कवेलू आणि टिनाचे शेड असलेल्या झोपडपट्टीधारकांवर ६ हजार ते २० हजार रुपयांपर्यंतची कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरातील हजारो नागरिकांना याच प्रकारची थकबाकीची नोटीस पाठविण्यात आली आहे. उदाहरणार्थ मेकोसाबाग येथील फुलाबाई नीलकंठ गजभिये यांनी २००९ ते २०१२ पर्यंत २४९३ रुपये घर टॅक्स भरला आहे. त्यांच्याकडे त्याची रीतसर पावतीसुद्धा आहे. त्यांच्याकडून २०१२ ते २०१४ या कालावधीतील कर आकारणी करायला हवी होती. परंतु त्यांना २००८ ते २०१४ पर्यंत १४,९०४ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. मेकोसाबाग येथीलच लक्ष्मण गणवीर यांनीसुद्धा गेल्यावर्षी नियमितपणे कर भरला. परंतु त्यांना २०१२ ते २०१४ या कालावधीसाठी ९६६३ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली. याच प्रकारे उत्तर नागपुरातील बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा तर दक्षिण नागपुरातील मानेवाडा, बजरंगनगर आदी परिसरातील नागरिकांना कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)एकाच घरात राहणाऱ्या दोघांना वेगवेगळा कर लुंबिनीनगर येथे भूषण हरिदास पाटील, मनोज हरिदास पाटील यांचे सिमेंट शीटाचे एक घर आहे. एकाच घरात दोघे भाऊ आपल्या परिवारासह वेगवेगळे राहतात. त्यापैकी दोघांनाही कर आकारणीची नोटीस आली. भूषणला २०१० ते २०१४ या कालावधीची एकूण कर आकारणी २०,९६४ रुपये तर त्याच घरात राहणाऱ्या मनोजला मात्र २००८ ते २०१४ या कालावधीसाठी ९१८७ रुपये कर आकारणीची नोटीस पाठविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांची टाळाटाळ बेझनबाग, मेकोसाबाग, इंदोरा, बजरंगनगर, मानेवाडा येथील नागरिकांनी झोन कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, अधिकारी व्यवस्थित उत्तर न देता टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जायचे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.