शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मनपा मुख्यालय परिसरात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 8:55 PM

सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथक थुंकणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परिसर घाण करण्याच्या प्रकाराची आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेत १२ कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देघाण केल्याची आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सर्वत्र स्वच्छता राहावी, सार्वजनिक ठिकाणी घाण होऊ नये यासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शहरातील विविध भागांमध्ये नजर ठेवली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करून शहर विद्रुप करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातच नव्हे तर सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथक थुंकणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परिसर घाण करण्याच्या प्रकाराची आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेत १२ कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.यात सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी वाहन चालक शेखर शंखदरबार, शिक्षण विभागातील सहायक अधीक्षक अनिल कराडे, स्थानिक संस्था कर विभागाचे समिती विभागात कार्यरत मोहरीर भूपेंद्र तिवारी, कर संग्राहक सुनील मोहोड,कर आकारणी विभागातील वित्त विभागातील ज्येष्ठ श्रेणी लिपीक प्रमोद कोल्हे, आरोग्य विभागाचे मागासवर्ग कक्षात कार्यरत सफाई मजदूर अविनाश बन्सोड, आरोग्य विभागातील जमादार स्वप्निल मोटघरे, एस.आर.ए. विभागातील चपराशी भगवानदिन पटेल, स्थानिक संस्था कर विभागाचे मोहरीर विकास गावंडे, अग्निशमन विभागातील हॅड्रन्ट कुली रवींद्र सतभैया, सामान्य प्रशासन विभागातील शैलेश ढगे, कर व कर आकारणी विभागातील कनिष्ठ निरीक्षक प्रमोद मोगरे आदींचा समावेश आहे. या सर्वांंना आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबनाची नोटीस बजावली आहे.शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे. ११ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपा. मुख्यालयात एकू ण १०५ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करण्यासाठी दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये उघड्यावर लघवी करणाऱ्या १५ प्रकरणात ३००० रुपये, ९० प्रकरणात ९००० रुपये दंड याप्रमाणे १०५ प्रकरणात एकूण १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या १०५ जणांमध्ये मनपाच्या विविध विभागात कार्यरत १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.घाण केल्यास कारवाई होणारआपले घर, परिसर व शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याशिवाय आपण जिथे काम करतो त्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कुठेही घाण करु नये. घाण करुन आपला परिसर, शहर विद्रुप केल्याचे निदर्शनास आल्यास उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे .

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीsuspensionनिलंबन