बकरा व्यापाऱ्यांच्या याचिकेवर एपीएमसी कळमनाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 08:17 PM2020-06-19T20:17:14+5:302020-06-19T20:19:43+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बकरा व्यापाऱ्यांना लायसन्स नाकारण्याच्या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाला नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

Notice to APMC Kalmana on petition of goat traders | बकरा व्यापाऱ्यांच्या याचिकेवर एपीएमसी कळमनाला नोटीस

बकरा व्यापाऱ्यांच्या याचिकेवर एपीएमसी कळमनाला नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बकरा व्यापाऱ्यांना लायसन्स नाकारण्याच्या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाला नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
यासंदर्भात हरेश्वर रारोकर व इतर पाच बकरा व्यापाऱ्यांनी रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बकरा व्यापाराचे लायसन्स मिळण्याकरिता अर्ज सादर केले होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशाचे कारण सांगून त्यांना लायसन्स नाकारण्यात आले. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. एपीएमसी कायद्यानुसार समिती लायसन्स जारी करू शकते. परंतु, समितीने वादग्रस्त निर्णय घेताना सर्वांगीण गोष्टी विचारात घेतल्या नाहीत असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे व अ‍ॅड. ओंकार देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Notice to APMC Kalmana on petition of goat traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.