शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

लॉकडाऊनमुळे नोटबुक व स्टेशनरीचा व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:25 IST

कोरोना लॉकडाऊनने नोटबुक व स्टेशनरीचा व्यवसाय संकटात आला असून शालेय सिझनसाठी उत्पादन ठप्प झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असून दुकानांमध्ये असलेला माल विक्रीविना पडून आहे. यामुळे पेपर ट्रेडर्स आणि स्टेशनर्सला आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशाळा सुरू झाल्यानंतर होणार तुटवडा, दर वाढणार

आनंद शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनने नोटबुक व स्टेशनरीचा व्यवसाय संकटात आला असून शालेय सिझनसाठी उत्पादन ठप्प झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असून दुकानांमध्ये असलेला माल विक्रीविना पडून आहे. एप्रिलमध्ये शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणारा नोटबुक आणि स्टेशनरीचा पुरवठा बंद आहे. यामुळे पेपर ट्रेडर्स आणि स्टेशनर्सला आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.कोट्यवधींचा फटकापेपर ट्रेडर्स असोसिएशनचे सदस्य संजय खुळे म्हणाले, नोटबुक, रजिस्टर आणि स्टेशनरीकरिता नागपूर मध्य भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथून नागपूरसह संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नोटबुक, रजिस्टर आणि स्टेशनरीचा पुरवठा होतो. गांधीबाग, इतवारी, टेलिफोन एक्स्चेंज चौक येथील बहुतांश घरांमध्ये नोटबुक, रजिस्टर तयार होतात. एमआयडीसी क्षेत्रात काही कारखान्यांमध्ये निर्मिती होते. शालेय सिझनकरिता जानेवारीत पेपरची खरेदी करण्यात येते तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये नोटबुक, रजिस्टर तयार केले जातात. पण लॉकडाऊनमुळे या कामावर परिणाम झाला असून एप्रिलमध्ये शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोटबुक आणि रजिस्टरचा पुरवठा झाला नाही. यामुळे शहरातील प्रमुख ३०० नोटबुक आणि रजिस्टर व्यापाऱ्यांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यास नोटबुक आणि रजिस्टरचा तुटवडा होऊन दर वाढू शकतात. .नुकसानीतून बाहेर येण्यास लागणार तीन वर्षेविदर्भ पेन अ‍ॅण्ड स्टेशनर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनदास आहुजा म्हणाले, स्टेशनरीचे आॅर्डर जानेवारीपासून घेणे सुरू होते. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये उत्पादन होऊन शाळांच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येतो. पण यंदा लॉकडाऊनमुळे स्टेशनरीचे उत्पादन झाले नाही. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर तुटवडा होणार आहे. दर वाढू शकतात. स्टेशनरीचा बराच माल ट्रान्सपोर्टमध्ये अडकला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये स्टेशनर्सला ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नागपुरात ३५० पेक्षा जास्त स्टेशनर्स आहेत. त्यांना नुकसान भरून काढण्यासाठी तीन वर्षे लागणार आहे.वीज बिल व कर्जावरील व्याजात शासनाने सूट द्यावीनोटबुक व स्टेशनरी व्यापाऱ्यांना होणारे नुकसान पाहता सरकारने वीज बिल व कर्जावरील व्याजात सूट देण्याची विनंती असोसिएशनने सरकारकडे केली आहे. सीसी लिमिटवरील व्याज माफ करणे, कर्मचाºयांचे वेतन ३० टक्के देण्याची मागणी मान्य करणे आणि करात सवलत देण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस