शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राजनेता नव्हे, जनसहभागातून भारत बनेल विश्वगुरू : आनंद कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:35 IST

प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसेवासदन संस्थेचा रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताचा इतिहास अतिशय संपन्न आहे. त्या इतिहासाचे अवलोकन केल्यास आपले भविष्य खूप उज्ज्वल आहे, असे जाणवेल. परंतु एखादा राजकारणी येऊन आपल्या देशाला महासत्ता बनवेल, हा विचार मनातून काढून टाका. एखादा नेता फारतर सहकार्य करेल पण प्रयत्न प्रत्येकालाच करायचे आहेत. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.सेवासदन शिक्षण संस्थेच्या ९३ व्या वर्धापन दिननिमित्त विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार समारोहाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी आनंद कुमार बोलत होते. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून यंदा हा पुरस्कार श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारा संचालित सावनेरच्या मूकबधिर निवासी शाळा या संस्थेला देण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी गोयल गंगा ग्रुपचे संचालक अतुल गोयल, आमदार नागो गाणार, सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव इंदूबाला मुकेवार, पुरस्कार समितीच्या कार्याध्यक्षा वासंती भागवत, पुरस्कारप्राप्त संस्थेचे संस्थापक नारायण समर्थ प्रामुख्याने उपस्थित होते.आनंद कुमार यांनी पुढे बोलताना, १०, २०, ३० वर्षात एक वेळ येईल जेव्हा भारत विश्वगुरू बनेल आणि युरोप, अमेरिकेचेही लोक नागपूरसह भारतात शिक्षण आणि येथील रुग्णालयात उपचारासाठी येतील. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. रमाबाई रानडे यांनी १०० वर्षापूर्वी शिक्षणाचे महत्त्व ओळखून महिलांच्या शिक्षणासाठी कार्य केले, म्हणून आज असंख्य महिला पुढे जात आहेत. सेवासदन किंवा पुरस्कार घेणाऱ्या श्री मंगल संस्थेसारख्या अनेक संस्था, असंख्य लोक समाजाच्या उत्थानासाठी कार्य करीत आहेत. अशा संस्थांना, लोकांना प्रोत्साहित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. केवळ प्रोत्साहन देऊन होणार नाही तर स्वत: त्या कामात सहभागी व्हा. देशात आजही दलित, वंचित, मागासवर्गीय मुले, महिला शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत. अशा गरजवंतांसाठी वेळ काढून थोडे कार्य करा. प्रत्येक मुलांवर विश्वास ठेवा, त्यांच्यात डॉक्टर, वैज्ञानिक, नोबेल प्राप्त करण्याच्या संभावना आहेत. हे काम करताना अनेक अडचणी येतील, पण धैर्याने, संयमाने काम करीत राहिल्यास यश मिळेल व भारत महासत्ता होईल,असे आवाहन आनंद कुमार यांनी केले.यावेळी अतुल गोयल यांनी, रमाबाई रानडे यांच्या कार्याचे कौतुक केले. ज्या समाजात महिलांना सन्मान मिळतो, तो समाज आणि देश समृद्ध होतो. मात्र पुरुषप्रधान मानसिकतेचा देश महासत्ता बनू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या काळात आनंद कुमार यांच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे. मात्र आता शिक्षकांमध्ये नैतिकतेचा अभाव दिसून येत असल्याची खंत व्यक्त करीत या कामात साधनेचा भाव येईपर्यंत आपण महाशक्ती बनू शकत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले तर संचालन आशुतोष अडोणी यांनी केले.गडकरी दाम्पत्याचे कौतुकआनंद कुमार यांनी यावेळी देशभरात हायवेचे जाळे पसरविणारे नितीन गडकरी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री असल्याची भावना व्यक्त केली. मात्र महिलांना सक्षम करण्यासाठी झटणाऱ्या कांचन गडकरी यांचे कार्य त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मराठी लोक बिहारी माणसांना पळवून लावतात, असे बोलले जाते पण नागपुरात माझे नेहमी प्रेमाने स्वागत झाले, त्यामुळे मला असे जाणवत नाही, असे बोलताच सभागृहात हंशा पिकला.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर